धक्कादायक! ‘शर्मा नव्हे सिद्दीकी’, कित्येक वर्षांपासून भारतात वास्तव्य; पाकिस्तानी कुटुंबाचा भांडाफोड

धक्कादायक! ‘शर्मा नव्हे सिद्दीकी’, कित्येक वर्षांपासून भारतात वास्तव्य; पाकिस्तानी कुटुंबाचा भांडाफोड

Pakistani Living in India : कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळुरू येथे दोन दिवसांपूर्वी शर्मा कुटुंब म्हणून राहात असलेल्या चार पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे कुटुंब २०१८ पासून भारतात वास्तव्य करत होतं. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करत या कुटुंबाला अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार पकिस्तानी व्यक्तीची बायको ही बांगलादेशची आहे आणि याआधी ते ढाका येथे राहात होते जेथे त्यांचं लग्न झालं होतं.

रामबाबू शर्मा आणि राणी शर्मा

आरोपी ४८ वर्षीय राशिद अली सिद्दीकी, ३८ वर्षीय आएशा आणि महिलेचे आई-वडिल ७८ वर्षीय हनीफ मोहम्मद आणि ६१ वर्षीय रुबीना राजापुरा गावात राहात होते. येथे कुटुंब शंकर शर्मा, आशा राणी, रामबाबू शर्मा आणि राणी शर्मा या नावाने राहात होतं अशी माहिती पोलिसांनी दिली अस इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार सांगण्यात आलं आहे.

Sony Network Down: सोनी प्लेस्टेशन नेटवर्क झालं डाऊन; नेटकऱ्यांकडून तक्रारींचा होतोय भडीमार

पोलीस अटक करण्यासाठी पोहचले तेव्हा सिद्दीकी कुटुंबाची बांधाबांध सुरू हती. चौकशीत सिद्दीकी यांनी स्वतःचं नाव शर्मा सांगितलं आणि ते २०१८ पासून बंगळुरूमध्ये राहात असल्याचं देखील सांगितलं. तपासादरम्यान या कुटुंबाने भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड देखील दाखवलं. रिपोर्टनुसार जेव्हा पोलीस घरी पोहतले तेव्हा त्यांना मेहदी फाउंडेशन इंटरनॅशनल जश्न-ए-यूनुस असं भिंतीवर लिहील्याले आढळून आलं. सोबतच घरात काही मौलविंचे फोटो देखील आढळून आले.

चौकशीमध्ये सिद्दीकी उर्फ शंकर शर्मा याने मान्य केलं की, तो पाकिस्तानामधील लियाकताबाद येथील रहिवासी आहे. तर त्याची पत्नी आणि त्याचं कुटुंब लाहौर येथील आहे. त्याने सांगितलं की आएशा सोबत २०११ मध्ये एका ऑनलाइन समारंभात त्याचं लग्न झालं होतं. तेव्हा ती बांगलादेशात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. सिद्दीकीने आपल्याच देशातील त्रासाला कंटाळून त्याला पाकिस्तान सोडून बांगलादेशात जावं लागल असंही तो म्हणाला.

भारतात कसे पोहचले?

एफआयआरमध्ये सांगण्यात आलं आहे की, सिद्दीकी यांने बांगलादेशात स्थलांतर केलं, तेथे तो उपदेशक बनला. २०१४ मध्ये सिद्दीकी याला बांगलादेशात लक्ष्य करण्यात येऊ लागले, त्यानंतर तो भारतातील परवेज नावाच्या मेहदी फाऊंडेशनच्या सदस्याच्या सपर्कात आला आणि अवैध पद्धतीने भारतात स्थलांतरित झाला. रिपोर्टनुसार सिद्दीकी त्याची पत्नी आणि तिच्या आई वडिल जैनबी नूर आणि मोह्हमद यासीन बांगलादेशहून पश्चिम बंगालच्या मालदा मार्गे पोहचला होता. येथे काही एजंट्सनी त्यांची मदत केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, हे कुटुंब सुरूवातीला काही दिवस दिल्लीत देखील वास्तव्यास होते आणि त्यांनी बनावट आधार कार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हींग लायसेन्स देखील मिळवले. २०१८ मध्ये नेपाळ दौऱ्यावेळी सिद्दीकी याची भेट बंगळुरू येथील वाशिम आणि अल्ताफ यांच्याशी झाली त्यानंतर त्यांनी बंगळुरू येथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अल्ताफने त्याला घरभाडे पुरवले आणि मेहदी फाउंडेशनने त्याला इतर गोष्टींसाठी पैसे दिले. सिद्दीकी हा गॅरेजमध्ये ऑइल सप्लाय करणं तसंच खाद्यपदार्थ विकण्याचं काम करत होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या