Sony Network Down: नेटकऱ्यांकडून तक्रारींचा भडीमार; सोनी प्लेस्टेशन नेटवर्क का झालं डाऊन?
Sony PlayStation Network Down : सोनीचे प्लेस्टेशन वापरणाऱ्या जगभरातील हजारो वापरकर्त्यांना आउटेजची समस्या भेडसावत आहे. आज पहाटे 05:00 च्या सुमारास प्लेस्टेशन नेटवर्क मोठ्या प्रमाणात स्लो झालं आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तक्रारी करायला सुरूवात केली आहे. सकाळी 08:00 पर्यंत, भारत आणि जगातील इतर अनेक (Network ) देशांमध्ये प्लेस्टेशन नेटवर्क वापरणाऱ्या सुमारे 80,000 वापरकर्त्यांनी आउटेजची समस्या नोंदवली आहे.
video : दारू पिण्याची वेळ संध्याकाळी 7 वाजताची असते का? व्हायरल व्हिडिओवर काय म्हणाले हाके?
Downdetector च्या मते, प्लेस्टेशन नेटवर्क आउटेजची तक्रार करणाऱ्या एकूण वापरकर्त्यांपैकी 80 टक्के सर्व्हर कनेक्शनच्या अडचणींचा सामना करत आहे. वापरकर्त्यांपैकी 14 टक्के वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. तर 6 टक्के वापरकर्त्यांना, गेम खेळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्वच स्तरावरुन नेटकऱ्यांनी तक्रारींचा भडीमार सुरू केला आहे.
video : राऊत अन् नड्डांची दिल्लीत तर फडणवीस अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, काय आहे प्रकरण?
प्लेस्टेशन नेटवर्कमध्ये उद्भवणारी ही अडचण मोठ्या प्रमाणावर वापरकर्त्यांना त्रासदायक ठरत आहे. अधिकृत प्लेस्टेशन नेटवर्कनुसार, आउटेज PS Vita, PS3, PS4, PS5 आणि अगदी वेबवरही परिणाम झाला आहे. या समस्येमुळे, सध्या प्लेस्टेशन नेटवर्क वापरणारे वापरकर्ते त्यांच्या खात्यात लॉग इन करू शकत नाहीत. मल्टीप्लेअर गेम खेळू शकत नाहीत. तसंच, बरेच वापरकर्ते कोणत्याही गेममध्ये प्रवेश देखील करू शकत नाहीत असंही समोर आलं आहे.