video : दारू पिण्याची वेळ संध्याकाळी 7 वाजताची असते का? व्हायरल व्हिडिओवर काय म्हणाले हाके?
कालपासून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर स्वत: लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेतली.

Lakshiman Hake On Viral Video : ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचं नेतृत्व करणारे लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ कालपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर स्वत: हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी हाके म्हणाले, दारू पिण्याची वेळ सायंकाळी सात वाजताची असते का? हे सगळ षडयंत्र रचलं होत. मी जर दारू पित असेल तर गृह खात्याने याची चौकशी करावी असं आव्हान लक्षमण हाके यांनी केलं आहे.
Video : लक्ष्मण हाकेंनी मद्यपान करून शिविगाळ केली; मराठा तरुणांचा आरोप
आम्ही गरीब, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी लढा उभा केला आहे. तो मोडून काढण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत. परंतु, आमच्यावर गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही, तर हा आमचा लढा चालूच राहील असंही हाके यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर मी पुण्यात ज्या भागात राहतो त्या भागात कुणालाही विचारा आणि कोणत्याही हॉटेलमध्ये विचारा मी दारू पितो का असंही हाके यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, हाके यांना यावेळी आपण दारू पिलो नव्हतो या मुद्यावर ठोक काही सांगता आलं नाही. त्यांनी वेगवेगळ्या विषय घेऊन जास्त भाष्य केलं. दारू पिल्याचा मुद्दा मात्र टाळला.