आम्ही यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाही; ठाणे पोलिसांनी पाच मिनीटात पत्रकार परिषद आटोपली

  • Written By: Published:
आम्ही यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाही; ठाणे पोलिसांनी पाच मिनीटात पत्रकार परिषद आटोपली

Thane Police on Akshay Shinde Encounter :  एक पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला. त्या पोलीस अधिकाऱ्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यापेत्रा या घटनेत आम्ही तुम्हाला जास्त माहिती देऊ शकत नाहीत असं ठाणे पोलीस आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. (Thane Police ) यावेळी त्यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना काही उत्तर दिली नाहीत. दरम्यान, या घटनेप्रकरणी मुंब्रा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या सर्व घटनेचा तपास ठाणे पोलीस करत आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.

Video: ‘रावणाला जर हिंदुस्थानाने ठोकलं तर, अक्षय शिंदेंला सुट्टी देणार का?’,नरेश म्हस्केंची पोस्ट काय?

एफआयआरमध्ये खुलासा

पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा मृत्यू झाला. यावेळी पोलीस वाहनात नेमकं काय घडलं?, कुठून सुरुवात झाली?, आरोपी अक्षय शिंदेवर गोळी झाडण्याची पोलिसांवर वेळ का आली?, याबाबत संजय शिंदे यांनी एफआयआरमध्ये खुलासा केला आहे.

अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? जीव धोक्यात घातला अन् चालवली गोळी

अक्षय शिंदेचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू

बदलापूरच्या एका संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार केल्या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांच्या सीआययू यूनिटच्या पोलिसांनी तळोजा जेलमधून ताब्यात घेतलं होतं. मुंब्रा बायपास येथे पोहोचल्यावर अक्षय शिंदेनं पोलिसांकडून रिवॉल्वर हिसकावून घेत गोळीबार केला. त्यानं तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक गोळी एपीआय निलेश मोरे यांना लागल्याचं सांगण्यात आलं. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे जखमी झाला आणि त्याला कळवा येथील रुग्णालयात नेण्यात आलं तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube