Video: ‘रावणाला जर हिंदुस्थानाने ठोकलं तर, अक्षय शिंदेंला सुट्टी देणार का?’,नरेश म्हस्केंची पोस्ट काय?

  • Written By: Published:
Video: ‘रावणाला जर हिंदुस्थानाने ठोकलं तर, अक्षय शिंदेंला सुट्टी देणार का?’,नरेश म्हस्केंची पोस्ट काय?

Naresh Mhaske Tweet on Badlapur Encounter Case :  बदलापूर अत्याचारातल्या आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आता शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी किर्तनकार संग्राम बापू भंडारे या महारारांचा जुना व्हिडिओ ट्विट करत ‘एक’नाथ बलात्काऱ्याला थारा नाय’ असं वाक्य लिहलं आहे. (Badlapur) या व्हिडिओमध्ये भंडारे महाराज अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची मुख्यमंत्र्यांकडं मागणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा शिंदे गटाने सत्कारही केला आहे.

Encounter: इकडं अक्षय शिंदेचा एन्काऊंटर अन् दुसरीकडे संस्थाचालक आपटे जामिनासाठी हायकोर्टात

या प्रकरणातील जखमी पोलीस अधिकारी संजय शिंदे आणि निलेश मोरे यांची शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचा सत्कार केला. जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम रहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी आम्ही ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली, असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? जीव धोक्यात घातला अन् चालवली गोळी

आधी साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करत आहेत. आता पोलिसांवर आरोप करणे ही दुटप्पीपणाची हद्द झाली आहे. या आरोपीला भरचौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली ? पोलिसाची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. तीन पोलीस त्यात जखमी आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला. परंतु, विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत असंही म्हस्के म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube