बोलताना भान उरत नाही, त्यांनी असं बोलू नये; पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून म्हस्केंना फडणवीसांनी फटकारले

बोलताना भान उरत नाही, त्यांनी असं बोलू नये; पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून म्हस्केंना फडणवीसांनी फटकारले

Devendra Fadanvis On Naresh Mhaske for his statement about Pahalgam attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झालायं. या दहशतवादी हल्ल्यानंतर जे पर्यटक महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरला गेले होते, त्यांना विमानातून महाराष्ट्रात आणलं जात आहे. अशातच महाराष्ट्रातील पहलगाममध्ये अडकलेल्या 45 लोकांना विमानातून परत आणल्यानंतर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना नरेश म्हस्के यांनी एक वादग्रस्त विधान केलं. त्यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फटकारले आहे.

गुडन्यूज! ऐन लगीन सराईत सोनं स्वस्त, अक्षय्य तृतीयेच्या आधी किमतीत घट

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यानी पहलगाम हल्ला ते राहुल गांधींपर्यंत सर्व विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांना नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना म्हस्के यांची जीभ घसरली आहे. बोलताना कधी कधी भान उरत नाही. पण त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचं आहे. त्यांनी असं बोलू नये.

Devmanus film review: उंबरठ्यावर आलेलं वादळ परतवून लावणारा ‘देवमाणूस’

काय म्हणाले होते नरेश म्हस्के?

खासदार म्हस्के म्हणाले, जे कधी विमानात बसले नाहीत, त्यांना विमानाने परत आणत आहोत, जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता? अहो, 45 लोक रेल्वेने गेले होते. पहलगाममध्ये अडकले. गरीब लोकं, खाण्याचा प्रोब्लेम होता. एका सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ते लोकं राहत होते. त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी आता विमानतळावर आणलं. ती लोकं पहिल्यांदा विमानाने प्रवास करत आहेत. ते रेल्वेने गेली होती. ते घाबरलेली लोकं आहेत. त्यांना विमानात बसवून महाराष्ट्रात आणत आहेत. या कामांना कुरघोडी म्हणताय?, असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube