गुडन्यूज! ऐन लगीन सराईत सोनं स्वस्त, अक्षय्य तृतीयेच्या आधी किमतीत घट

Gold Price Fall Down In Ahead Of Akshaya Tritiya : सोने खरेदी (Gold Price) करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) आधी सोन्याच्या किमतीत थोडीशी घट झाली आहे. अलीकडेच सोन्याचा भाव 99,000 रुपयांच्या पुढे गेला होता, पण संध्याकाळपर्यंत त्यात सुधारणा झाली. आज सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत घसरण झाली. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 90,000 रुपयांवर आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर सुमारे 98,200 रुपयांवर आहे. चांदीचा (Silver) भाव 1 लाख रुपयांच्या वर आहे. आज शुक्रवार 25 एप्रिल 2025 रोजी सोन्या-चांदीचे दर काय आहेत, ते आपण जाणून घेऊ या.
चांदीच्या देखील किमतीत आज घसरण झाली आहे. चांदीचा भाव 1,00,800 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज 25 एप्रिल 2025 रोजी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा (Gold Silver) भाव 90,190 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,330 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 90, 040 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे.
विमानाने परत आणलं म्हणजे… उपकार करत आहात का? रोहित पवारांचा नरेश म्हस्केंना उपरोधिक सवाल
सोने उच्चांकी पातळीवर का आहे?
सोने महाग होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मजबूत स्थिती आणि डॉलरची कमकुवतता. अमेरिकन डॉलरने तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे, त्यामुळे सोन्याची मागणी आणि किंमत वाढली आहे. याशिवाय, अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे, गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याची निवड केली आहे. चीनवर नवीन शुल्क आकारण्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत आणि अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांच्या विधानामुळे जागतिक अनिश्चितता वाढली आहे, त्यामुळे त्यांनी सोने खरेदीला पाठिंबा मिळाला आहे.
मानहानीच्या प्रकरणात खासदार साकेत गोखले अडचणीत, उच्च न्यायालयाने दिले वेतन जमा करण्याचे आदेश
याशिवाय, देशांतर्गत बाजारात स्टॉकिस्ट आणि ज्वेलर्स विक्रेत्यांकडून येणाऱ्या जोरदार मागणीमुळेही सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. काल, दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 200 रुपयांनी वाढून 99,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. तांत्रिक सुधारणा आणि भू-राजकीय तणावानंतर गुंतवणूकदारांनी परतावा दिल्यामुळे सोन्याच्या किमतीत सध्याची वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, सरकारी कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढउतार अशा अनेक कारणांमुळे भारतात सोन्याच्या किमतीत बदल होतो. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही, तर ते आपल्या परंपरा आणि सणांचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः लग्न आणि सणांमध्ये सोन्याची मागणी प्रचंड वाढते.