विमानाने परत आणलं म्हणजे… उपकार करत आहात का? रोहित पवारांचा नरेश म्हस्केंना उपरोधिक सवाल

विमानाने परत आणलं म्हणजे… उपकार करत आहात का? रोहित पवारांचा नरेश म्हस्केंना उपरोधिक सवाल

Congress MLA Rohit Pawar On Naresh Mhaske Statement : जे लोक रेल्वेने जम्मू-काश्मीरला गेले, ज्यांचे खाण्याचे वांदे, त्या लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आले, त्यांनी विमान प्रवास केला’, असे असंवेदनशील वक्तव्य खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलं होतं. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वक्तव्य केलंय.

नरेश म्हस्के यांना सत्तेचा अहंकार आला आहे. सामान्य लोक जिथे जातात, ते स्वतःच्या खर्चाने जातात. सरकार त्यांना मदत करत नाही. मात्र, त्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना परत आणणे सरकारची जबाबदारी (Maharashtra Politics) आहे. तुम्ही म्हणता ज्यांची ऐपत नव्हती, त्यांना विमानाने परत आणलं म्हणजे तुम्ही काय उपकार करत आहात का? त्यांच्या नेत्यांनी त्यांना आता शहाणपण शिकवायला हवं, असा सवाल रोहित पवार यांनी केलाय.

हे पर्यटक ज्यावेळेस येथे अडकले होते, त्यावेळेस तेथील घोडेवाले टॅक्सीवाले यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले नाही. हे पर्यटक जेव्हा एअरपोर्टला आले, तेव्हा 38 हजार रुपये तिकीट विमान कंपन्यांनी केलं. अशामध्ये जर तुम्ही या पर्यटकांची ऐपत काढत असाल, तर या सरकारला खूप मोठा अहंकार आलाय, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

Ahilyanagar : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, ‘रावण गँग’ची पोलिसांनी काढली धिंड…

कर्जत तालुक्यातील कुकडी प्रकल्प 54 गावांचा हा पाणी प्रश्न आहे. सीना प्रकल्पात माझ्या मतदारसंघातील 22 गावं येतात. त्यामुळे दोन्ही प्रकल्पात लवकरात लवकर पाणी सोडण्याचे विनंती अधिकाऱ्यांना केली आहे. पाणी लवकरात लवकर सुटेल, असे आश्वासन त्यांनी दिले. कुकडीमध्ये पाणी उशिरा येऊ शकता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 320 जयंती आहे, त्यामुळे चौंडी या ठिकाणी कॅबिनेट व्हावी, अशी आमची देखील इच्छा आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादी प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्दच्या मुद्द्यावर रोहित पवार यांनी म्हटलं की, पवार साहेब, जयंत पाटील सुप्रियाताई यांनी पक्षात काही नवीन नियुक्त्या व्हाव्यात, असं वाटत असेल म्हणून पार्टीत निर्णय घेतला असेल, असं मला समजतंय असं रोहित पवार यांनी म्हटलंय. आमच्या पक्षात मत मांडण्याची मुभा आहे. महेश तपासे यांनी मांडलेली भूमिका त्यांची वैयक्तिक आहे. जितेंद्र आव्हाड यांची भूमिका सुद्धा तशी वैयक्तिकच आहे. पण तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं आणखी मोठा स्मारक होत असेल, तर त्याचं आम्ही स्वागतच करतो असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय.

राहुल गांधींना हवे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘हिंदुत्व पुस्तक’, न्यायालयात अर्ज

आमच्या देशात येऊन जर गोळ्या घालत असाल, तर देशातील कोणताही नागरिक हे खपवून घेणार नाही. सरकार जो निर्णय घेईल, त्यासोबत आम्ही आहोत. पहलगाम हल्ल्यानंतर भाजपला पाठिंबा दिलाय, असं म्हणून चालणार नाही. हा पाठिंबा सरकारला आहे. आपल्या भूमीत येऊन जर कोणी आतंकवाद करत असेल, गोळ्या घालत असेल तर सरकारला पाठिंबा देणं महत्त्वाचं आहे. मात्र पुलवामाच्या घटनेच्या वेळेस आणि यावेळेस सुद्धा इंटेलिजन्समध्ये चुका झाल्या. त्यावर काम करण्याची गरज आहे. आतंकवाद संपवण्यासाठी हे सरकार जे जे करेल, त्यासोबत आम्ही शेवटपर्यंत राहू असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube