सोने-चांदी गगनाला! तीन लाखांपार गेलेले चांदीमध्ये गुंतवणूक करण्याआधी वाचा तज्ज्ञ काय म्हणाले?

Silver ने तीन लाखांचा टप्पा पार केला. दर एवढे का वाढत आहेत? आताच्या घडीला खरेदी करावी की नाही, योग्य गुंतवणूक कशी करायची? जाणून घ्या...

Silver

Silver Price Surges, Crosses Rs 3 Lakh Per Kg Mark investing in silver read what experts said : सोन्या-चांदीचा विषय निघाला की, अनेकांना वाटायचं दाग-दागिने असो की, भांडी हे डिपार्टमेंट फक्त महिलांचं आम्हाला काय त्याचं? मात्र असं म्हणणाऱ्या जगभरातील लोकांची गेल्या काही वर्ष आणि विशेषत:महिन्यांपासून झोप उडवली ती याच सोने आणि चांदीच्या दराने दररोज सोने आणि चांदी गगनाला भिडत होतेच त्यात आता अनेक तज्ज्ञांनी सांगितल्या प्रमाणे सोन्याने अखेर दिड लाख तर चांदीने तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र चांदी आणि सोन्याचे दर एवढे का वाढत आहेत? आताच्या घडीला सोने-चांदी खरेदी करावी की नाही, तसेच यामध्ये योग्य गुंतवणुक कशी करायची? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं…

महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी राज्यभरात घोडेबाजार, कुणाची युती तर कुणाची आघाडी

सुरूवातीला पाहूयात 19 जानेवारी रोजी चांदीच्या किंमतींनी कीती सर्वोच्च पातळी गाठली? एमसीएक्सवर चांदीचे दर तीन लाख रुपये प्रति किलोवर पोहोचले तब्बल दोन दिवसांत चांदीच्या दरांत 14 हजार रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी चांदी दोन लाख 87 हजारांच्या आसपास होती. तर सराफा बाजारात आज चांदी सुमारे 12 हजार रुपयांनी वाढून 2.94 लाख रुपये प्रति किलोवर गेली आहे.

‘बाप्या’ ने गाठला जागतिक मंच! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये ‘बाप्या’ ची अधिकृत निवड

फक्त महिन्याभरापूर्वी म्हणजे 15 डिसेंबर 25 च्या आसपास चांदी पहिल्यांदा लाख रुपयांवर पोहोचली होती. त्यामुळे दोन लाखांवरून तीन लाखांवर चांदीला यायला केवळ एक महिना लागला. तर एक लाखांवरून दोन लाखांपर्यंत चांदीचे दर जायला नऊ महिने लागले. तर 50 हाजारावरून चांदी एक लाखांपर्यंत पोहोचायला 14 वर्षे लागली होती. त्यामुळे प्रश्न पडतो की असं काय झालं? ज्याने चांदी अशाप्रकारे गगनाला भिडली. तर ऐका, चांदीचा वापर केवळ दाग दागिने किंवा भांड्यांसाठीच होत नाही तर औद्योगिक क्षेत्रामध्ये जगभरात ग्रीन एनर्जी आणि सौर ऊर्जेचा वापर वाढत असल्याने सौर पॅनल, इलेक्ट्रिक वाहनं आणि फाईव्ह जी तंत्रज्ञानासाठी चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

जिथे धुरंधर 1 थांबला, तिथून धुरंधर 2 बोलेल; रणवीर सिंगचे दमदार संवाद

त्याचबरोबर जगभरात सुरू असलेला राजकीय तणाव युद्धाच्या पार्श्वभूमीवर महागाई वाढत असल्याने गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत. दुसरीकडे जगाच्या पातळीवर चांदीच्या किंमती डॉलरवर ठरतात. जेव्हा डॉलरचा निर्देशांक कमकुवत असतो. तेव्हा चांदीच्या किंमतीत वाढ होते. त्याचबरोबर मागणी वाढली. तरी देखील पुरवठा मात्र मर्यादित आहे. पर्यावरणीय नियमांमुळे खाणकामाला मर्यादा आहेत. तसेच 70 टक्के चांदी ही तांबे आणि जस्त यासारख्या धातूंच्या उत्खननादरम्यान उपउत्पादन म्हणून मिळते त्यामुळे जोपर्यंत तांब्याचा उपखंड वाढत नाही तोपर्यंत चांदीचा पुरवठा वाढू शकत नाही.

UPI Payment : ‘Free’ यूपीआयचा काळ धोक्यात येणार?; अर्थसंकल्पात मोठ्या निर्णयाची शक्यता

त्यामुळए अशा परिस्थितीमध्ये चांदीमध्ये आताच्या घडीला गुंतवणूक करणे योग्य आहे की त्यावर तज्ज्ञ काय सांगतात पाहा… यामध्ये मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस यांच्या अंदाजानुसार सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीमुळे 2026 मध्ये चांदी तीन लाख वीस हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. सॅम को सिक्युरिटीज यांनी चांदीच्या किमती थेट चार लाखांच्या जवळ म्हणजेच 3 लाख 94 हजारांवर जाण्याच्या अंदाज व्यक्त केला आहे.

महापौरपदासाठी ठाकरे–फडणवीस संवादाची कुजबुज? शिंदेंना कोपऱ्यात ढकलण्याचा ‘मेगाप्लॅन’

तर कमोडिटी तज्ज्ञ असलेले निलेश सुरांना सांगतात की ग्रीन एनर्जीची वाढती मागणी आणि अमेरिकेतील व्याजदर कपात त्यामुळे चांदी तीन लाख 50 हजार ते चार लाखांपर्यंत जाऊ शकते. तसेच पोनमुडी आर या एनरिच मनीच्या सीईओंनी देखील चांदीमधील ही तेजी अजून काही काळ सुरूच राहील त्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रत्येक घसरणीवर चांदीचा फायदा घ्यावा असं सांगितलं. तर जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार असलेले रॉबर्ट कियोसाकी सांगतात की, डॉलरची घसरण, महागाई यामुळे 2026 मध्ये चांदी चार लाखांच्याही पुढे जाईल.

देशातील मोठ्या राजकीय कुटुंबातील कलह समोर, थेट घटस्फोट देण्यापर्यंत गेली कहाणी

त्यामुळे चांदीमध्ये सुरक्षित गुंतवणूक करायची तर कशी करायची पाहूयात…सामान्यपणे सराफा बाजारात जाऊन चांदीची प्रत्यक्ष खरेदी केली जाते. त्यामध्ये नाणी किंवा बार घेतले जातात. मात्र यामध्ये चोरी आणि शुद्धतेची खात्री नसते. तरी देखील घ्यायचीच झाल्यास नामांकित ज्वेलर्सकडून बीआयएस हॉलमार्कची चांदी खरेदी करा.

त्यानंतरचा पर्याय आहे तो म्हणजे सिल्व्हर ईटीएफ हे चांदीच्या किंमतीवर आधारित असतात. शेअर प्रमाणे याचं ट्रेडिंग होतं. यासाठी डिमॅट खातं उघडावे लागतं. त्यानंतर सिल्व्हर फ्युचर्स हा देखील ट्रेडिंगचा एक मार्ग आहे. ज्या ठिकाणी एक करार केला जातो. त्यानुसार भविष्यातील निश्चित तारखेला ठरलेल्या किंमतीवर तुम्ही चांदी खरेदी किंवा विक्री करता. हे कमोडिटी एक्सचेन्जवर करता येते मात्र यामध्ये धोका जास्त आहे.

follow us