दिवाळीचा सण दोन दिवसांवर असतानाच चांदीच्या भावात मोठा बदल; वाचा, कुठ काय आहेत भाव?
चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजारपेठेत चांदीच्या भावात दोन दिवसात 22 हजरांची घसरण झाली आहे.

दिवाळीचा महत्वाचा सण दोन दिवसांवर आलेला असतानाच नागरिकांना महत्वाची बातमी मिळाली आहे. (Diwali) चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजारपेठेत चांदीच्या भावात दोन दिवसात 22 हजरांची घसरण झाली आहे.
देशभरात चांदीच्या शुद्धतेसाठी प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील बाजारपेठेत तीन दिवसात चांदीच्या भावात 22 हजार रुपयांची घसरण झाल्याने आज धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा मोठा उत्साह दिसला. दोन दिवसांपूर्वी चांदीचे भाव 1 लाख 90 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते. मात्र आज धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 22 हजार रुपयांनी चांदीचे भाव कमी होऊन जवळपास 1 लाख 68 हजार रुपये प्रति किलो झाले आहेत.
Dhanteras : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्टची खास सेवा; धनतेरसला घरबसल्या खरेदी करा सोने-चांदी
चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळं आज धनत्रयोदशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी चांदी खरेदी केल्याचं समोर येत आहे. वाढत्या दरामुळं अनेक ठिकाणी ग्राहकांनी चांदीची खरेदी करण्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, आज दरात तब्बल 22 हजार रुपयांची घसर झाल्यामुळं चांदी खरेजीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दिवसेंदिवस चांदीचे भाव वाढत असल्याने व आगामी सण आणि लग्नसराईच्या अनुषंगाने अनेकांचे बजेटही कोलमडल्याचं दिसत आहे. खामगाव येथील चांदीची बाजारपेठ ही देशभरात प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे देशभरातून ग्राहक खामगाव येथे चांदी खरेदीसाठी येत असतात.
गेल्या वर्षभरातील चांदीचे भाव
-07 Oct – 2024 – 88 हजार रु प्रति किलो.
-1 Jan – 2025 – 99 हजार 500 रु प्रति किलो.
-1 March 2025 – 1 लाख 01 हजार रु प्रति किलो.
-1 Jun 2025 – 1लाख 10 हजार रु प्रति किलो.
-1 Sept 2025 – 1 लाख 40 हजार रु प्रति किलो.
18 oct 2025 – 1 लाख 68 हजार रुपये प्रति किलो