Dhanteras : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्टची खास सेवा; धनतेरसला घरबसल्या खरेदी करा सोने-चांदी

देशभरात आज (दि.18) धनतेरस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू परंपरेनुसार, हा दिवस सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो.

  • Written By: Published:
Dhanteras : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्टची खास सेवा; धनतेरसला घरबसल्या खरेदी करता येणार सोने-चांदी

Buy Gold & Silver From Home Through Blinkit, Zepto Instamart Know Details : देशभरात आज (दि.18) धनतेरस मोठ्या (Dhanteras) उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू परंपरेनुसार, हा दिवस सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. सोने आणि चांदीची खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये तोबा गर्दी असते. त्यामुळे बराच वेळ दुकानांमध्येच जाऊ शकतो. वेळेचे हेच महत्त्व लक्षात घेता आजच्या दिवशी तुम्ही घरात बसून सोने आणि चांदीची (Gold & Silver) खरेदी करू शकणार आहात. ब्लिंकिट, स्विगी इन्स्टामार्ट, झेप्टो, बिग बास्केट आणि अमेझॉन सारख्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मने धनतेरससाठी विशेष सोने आणि चांदी डिलिव्हरी सेवा सुरू केल्या आहेत.

सोनं चमकलं, शेअर बाजार थंडावला! मागच्या दिवाळीनंतरचा धक्कादायक हिशेब

कोण-कोणत्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येणार सोनं-चांदी

ब्लिंकिट : ब्लिंकिटने 10 मिनिटांत तुमच्यापर्यंत सोने आणि चांदी पोहोचवण्यासाठी MMTC-PAMP सोबत भागीदारी केली आहे. तुम्ही ब्लिंकिट अॅपद्वारे 24 कॅरेट 999.9+ शुद्धतेसह 1 ग्रॅम लोटस गोल्ड बार, 0.5 ग्रॅम लोटस गोल्ड कॉइन आणि 10 ग्रॅम लक्ष्मी गणेश सिल्व्हर कॉइन ऑर्डर करू शकता. प्रत्येक उत्पादनात MMTC-PAMP चे सुरक्षित पॅकेजिंग आणि ओपन-बॉक्स डिलिव्हरी असेल, म्हणजेच डिलिव्हरी झाल्यावर तुम्ही नाण्यांची तपासणी करू शकता. Buy Gold & Silver From Home Through Blinkit, Zepto Instamart Know Details

Crackers History : मुघलांनी की, आणखी कुणी भारतात फटाके आणले कुणी? इतिहास काय?

स्विगी इन्स्टामार्ट : या धनत्रयोदशीला स्विगी इन्स्टामार्ट निवडक शहरांमध्ये सोने आणि चांदीची डिलिव्हरी करत आहे. याद्वारे तुम्ही 0.1 ग्रॅम ते 10 ग्रॅम पर्यंतचे सोन्याचे नाणी आणि 1 किलो चांदीचे बार काही मिनिटांत ऑर्डर करू शकता. तुम्हाला प्रमाणित सोने आणि चांदी प्रदान करण्यासाठी स्विगीने कल्याण ज्वेलर्स, मलबार गोल्ड, मुथूट एक्झिम, एमएमटीसी-पीएएमपी, मिया बाय तनिष्क, वॉयला आणि गुल्लक सारख्या ब्रँडसोबत भागीदारी केली आहे.

झेप्टो, बिग बास्केट आणि अमेझॉन

वरील दोन प्लॅटफॉर्मशिवाय तुम्ही झेप्टोवर धनतेरससाठी सोन्याचे नाणे ऑर्डर करू शकाल. जे काही मिनिटांतच डिलिव्हर केले जातील. बिग बास्केटने तनिष्कशी करार केला असून, जिथे तुम्ही 10 ग्रॅम लक्ष्मी गणेश चांदीचे नाणे (999.9 शुद्धता), 1 ग्रॅम तनिष्क 22 कॅरेट सोन्याचे नाणे आणि 1 ग्रॅम लक्ष्मी मोटिफ सोन्याचे नाणे खरेदी करू शकाल.

follow us