History of Fireworks | फटाक्यांचा शोध कुणी लावला आणि सर्वप्रथम फटाके कुठे आणि कधी वाजला ? वाचा सविस्तर..

History of Fireworks

History of Fireworks

दिवाळी म्हटलं की लक्षात येतं – दिवे, फराळ आणि सगळ्यांत जास्त… फटाके पण कधी विचार केला का, हे फटाके (History of Fireworks) आपल्या भारतात आले तरी कुठून?
चला, आज जाणून घेऊया या धमाकेदार प्रवासाची गोष्ट — चीनपासून भारतापर्यंतची!

( History of Fireworks) फटाक्यांचा जन्म कुठे झाला? पहिला फटाका कसा होता?

फटाक्यांचा जन्म चीनमध्ये झाला, तेही तब्बल इ.स. ९व्या शतकात! चिनी लोकांनी “गनपावडर”चा शोध लावला आणि ती वापरली वाईट आत्म्यांना घालवण्यासाठीआणि सुरुवातीला हा फक्त आवाज आणि धूर करणारा प्रकार होता, पण लोक म्हणायचे जिथं आवाज तिथं आनंद
त्या काळात फटाके काही रंगीबेरंगी नव्हते.बांबूच्या पोकळ काडीत गनपावडर भरून आग लावायची. आणि मग… पाँक असा आवाज! तो आवाज म्हणजे शुभशकुन मानला जायचा सण, आनंद आणि विजयाचं प्रतीक.

देशभरात आज दिवाळी सणाचा उत्साह! लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? ‘या’ राशींना होणार धनलाभ

पहिल्यांदा फटाके कुठे फोडले गेले?

मुघल दरबारात सगळ्यात आधी फटाके फोडले गेले, दिल्ली, आग्रा इथे सण, लग्नं आणि विजय सोहळ्यांत “आतिशबाजी” केली जायची. तेव्हा हा प्रकार फक्त राजघराण्यांसाठी होता. पण जसजसा काळ गेला, तसतसे लोकही या उत्सवात सामील झाले.

Diwali2025

Diwali2025

भारतात फटाके कसे आले?

सिल्क रूट आणि समुद्री व्यापारमार्गांद्वारे चीनहून भारतात फटाके आले, अरबी आणि पर्शियन व्यापाऱ्यांनी “आतिशबाजी”ची कला भारतात आणली
सुमारे १३व्या–१४व्या शतकात म्हणजेच, फटाके म्हणजे फक्त आवाज नव्हे ती एक कला होती.

दिवाळीत फटाके कसे आले? अंधारावर प्रकाशाचा विजय, हीच खरी दिवाळीची भावना. हळूहळू लोकांनी प्रकाशासोबत धमाकाही जोडला. फटाके म्हणजे आता आनंद, जल्लोष आणि एकत्र साजरा करण्याचं प्रतीक बनलं. फटाका फुटला तरच सण पेटला असं म्हणणं काय वावगं ठरणार नाही.

भारतात फटाके बनवण्याची सुरुवात

सुरुवातीला फटाके विदेशातून आयात होत होते. पण ब्रिटिश काळात (१९वे–२०वे शतक) भारतातच त्याचं उत्पादन सुरू झालं. आज शिवकाशी (तमिळनाडू) हे भारताचं “Fireworks Capital” म्हणून जगप्रसिद्ध आहे. तेथूनच दिवाळीच्या दिवसांत देशभर फटाक्यांचा वर्षाव होतो. आजच्या काळात पर्यावरणाची काळजी घेऊन ग्रीन फटाके तयार केले जात आहेत. हे फटाके कमी आवाजाचे, कमी प्रदूषण करणारे, पण जल्लोष मात्र तितकाच मोठा फटाक्यांची गोष्ट म्हणजे केवळ आवाज किंवा धमाका नव्हे, तर ती इतिहास, परंपरा आणि आनंदाचं मिश्रण आहे. चीनच्या प्रयोगशाळेतून सुरू झालेला हा प्रवास. आज आपल्या प्रत्येक दिवाळीत उजळतोय, धमाका, रंग आणि आनंदाने!

follow us