कधी विमानात बसले नाहीत, त्यांना विमानात परत आणलं; शिंदेंच्या खासदाराचं वादग्रस्त विधान

कधी विमानात बसले नाहीत, त्यांना विमानात परत आणलं; शिंदेंच्या खासदाराचं वादग्रस्त विधान

MP Naresh Mhaske : जे कधी विमानात बसले नाहीत, त्यांना विमानाने परत आणत आहोत, असं वादग्रस्त विधान शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (MP Naresh Mhaske) यांनी केलंय. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झालायं. या दहशतवादी हल्ल्यानंतर जे पर्यटक महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरला गेले होते, त्यांना विमानातून महाराष्ट्रात आणलं जात आहे. अशातच महाराष्ट्रातील पहलगाममध्ये अडकलेल्या 45 लोकांना विमानातून परत आणल्यानंतर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना नरेश म्हस्के यांनी हे विधान केलंय. म्हस्के यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Abir Gulal Ban In India : पाकिस्तानी अभिनेता फवादच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर केंद्रानं लादली बंदी

खासदार म्हस्के म्हणाले, जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता? अहो, 45 लोक रेल्वेने गेले होते. पहलगाममध्ये अडकले. गरीब लोकं, खाण्याचा प्रोब्लेम होता. एका सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ते लोकं राहत होते. त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी आता विमानतळावर आणलं. ती लोकं पहिल्यांदा विमानाने प्रवास करत आहेत. ते रेल्वेने गेली होती. ते घाबरलेली लोकं आहेत. त्यांना विमानात बसवून महाराष्ट्रात आणत आहेत. या कामांना कुरघोडी म्हणताय?, असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं.

पहलगाम दहशतवादी हल्ला, एकाच दिवसात तब्बल 70% टूर रद्द; अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

खासदार नरेश म्हस्के यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केलीयं. अंधारे म्हणाल्या, देश दुखा:त असताना सत्ताधाऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे. कुरघोड्यांच्या राजकारणात व्यस्त असलेले हे लोकं, यांचा सत्तेचा उन्माद इतका आहे की, त्या सत्तेच्या उन्मादापुढे लोकांच्या भावना संवेदना यांना काही वाटत नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा करायच्या? जी माणसं कधीच विमानात बसली नाहीत, त्यांना विमानात बसवून उपकार केले का तुम्ही? त्यांनी तुम्हाला निवडून आणलेलं आहे याचं भान ठेवा, तुम्ही मदत केली म्हणजे तुमचं कामच आहे, या शब्दांत अंधारे यांनी समाचार घेतलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube