इंडियन एअरफोर्स प्रमुखांनी पहिल्यांदाच सांगितला आकडा; वाचा, पाकिस्तानचे किती फायटर जेट्स पाडले?

इंडियन एअरफोर्स प्रमुखांनी पहिल्यांदाच सांगितला आकडा; वाचा, पाकिस्तानचे किती फायटर जेट्स पाडले?

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सैन्य संघर्ष झाला. भारताने पाकिस्तानातील लष्करी तळ उडवून दिले होते. यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. (Attack) त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लढाई झाली. भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं.

भारतीय सैन्य दलांनी केलेल्या या कारवाईवर इंडियन एअरफोर्सचे प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी इंडियन एअरफोर्सने पाकिस्तानची 5 फायटर जेट्स पाडली असं एअर फोर्स प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी सांगितलं. या ऑपरेशनच्या माध्यमातून आम्ही पाकिस्तानला स्पष्ट आणि कठोर संदेश दिला. पाकिस्तानच्या पाडलेल्या विमानांमध्ये पाच फायटर विमान आणि एक टेहळणी करणारं AWACS विमान होतं.

बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात बोलताना एअरफोर्सचे प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी ही माहिती दिली. भारताने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानची पाच फायटर विमानं पाडली. यात एक AEW&CS विमान होतं. पाकिस्तानी एअरफोर्सला या ऑपरेशनमध्ये किती नुकसान झालं? त्या बद्दल इंडियन एअरफोर्समधील सर्वोच्च पदावरुन पहिल्यांदाच पुष्टी करण्यात आलीय. पाकिस्तानने या वक्तव्यावर अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मतचोरीच्या आरोपावर आयोगाने उत्तर द्यावं, भाजपने नाही, शरद पवारांची राहुल गांधींना भक्कम साथ

बंगळुरुत एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना एपी सिंह म्हणाले की, “बहावलपूर आणि जैश-ए-मोहम्मद मुख्यालयावर हल्ला करण्याआधीचे आणि नंतरचे फोटो आमच्याकडे आहेत. इथे काहीच सामान शिल्लक उरलेलं नाही. आसपासच्या इमारती सुरक्षित आहेत. आमच्याकडे फक्त फोटोज नाहीत, तर स्थानिक मीडियाचे सुद्धा फोटोग्राफ्स आहेत”

राजकीय इच्छाशक्ती हे ऑपरेशन सिंदूर यशस्वी होण्यामागच मुख्य कारण असल्याचं एपी सिंह म्हणाले. “आम्हाला स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. आमच्यावर कुठलेही प्रतिबंध नव्हते. आम्ही ठरवलं की, किती पुढे जायचं आहे. आम्हाला योजना बनवून कार्यान्वित करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. आम्ही विचारपूर्वक हल्ले केले” असं एअरफोर्स प्रमुख म्हणाले.

22 एप्रिल रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निर्दोष पर्यटकांची हत्या केली. यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. 7 मे च्या सकाळी पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. यात 100 पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले. ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये चार दिवस संघर्ष चालला. 10 मे च्या संध्याकाळी पाच वाजता सीजफायरची घोषणा झाली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube