धक्कादायक! केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; बिहारमध्ये नेमकं काय घडलं?
Begusarai Giriraj Singh : बिहारमधील बेगुसरायमध्ये एक धक्कादायक (Girirraj Singh) घटना घडली आहे. केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील बेगुसराय (Bihar News) मतदारसंघाचे खासदार गिरीराज सिंह यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बलियामध्ये गिरीराज सिंह शनिवारी जनता दरबार कार्यक्रमात सहभागी झाले होते. येथे लोकांच्या समस्या जाणून घेत होते. त्याचवेळी एक व्यक्ती तेथे आला. माइक हातात घेऊन काहीतरी बोलला. यावेळी येथे उपस्थित असणाऱ्या भाजप नेत्यांनी (BJP) त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान या व्यक्तीने गिरीराज सिंह यांच्या जवळ जात त्यांना ठोसा लगावण्याचा प्रयत्न केला. परंतु, येथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं.
यावेळी येथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी गिरीराज सिंह मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या. गिरीराज सिंह यांच्यावर हल्ला (Bihar News) करणारा युवक नगरसेवक आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. या घटनेनंतर मंत्री गिरीराज सिंह यांनीही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. अशा घटनांनी मी आजिबात घाबरणार नाही, असे गिरीराज सिंह म्हणाले.
मोठी बातमी! नितीशकुमारांच्या जेडीयूत खांदेपालट; बड्या नेत्याने दिला राजीनामा, कारण काय?
मी गिरीराज आहे. समाजाच्या हिताच्या गोष्टी नेहमीच बोलत राहणार. संघर्ष करत राहणार. अशा घटनांनी मी आजिबात घाबरणार नाही. बिहारसहीत देशभरात लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि सांप्रदायिक तणाव निर्माण केला जातो आहे हे पाहून घ्या, असे त्यांनी विरोधी पक्षांना सुनावले. यानंतर आता विरोधी पक्षाचे नेत्यांच्याही या घटनेवर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, गिरीराज सिंह प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वक्तव्याने ते नेहमीच वादात अडकत असतात. आता त्यांच्यावर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकसभा निवडणुकीत बेगुसराय मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. तसेच 2014 पासून गिरीराज सिंह सातत्याने केंद्रात मंत्रिपदावर आहेत. शनिवारी झालेल्या या घटनेची बिहारच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे.
चंद्राबाबू अन् नितीशकुमारांनी दाखवली पॉवर : आंध्र अन् बिहारसाठी मोदींनी खोलली तिजोरी