मुस्लिम समाज ‘नमक हराम’, त्यांचे मते नकोत; केंद्रिय मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

Bihar Assembly Election 2025: ते उपकार माणून घेत नाही. त्यामुळे आम्हाला 'नमक हराम' लोकांचे मतांची गरज नाही- गिरिराज सिंह

  • Written By: Published:
Bihar Assembly Election 2025 Union Minister Giriraj Singh rematk against muslims

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election 2025) रणधुमाळी सुरू आहे. भाजपमधील नेते व काही केंद्रीय मंत्री ही मुस्लिम ( Muslims) समाजाबाबत वादग्रस्त विधाने करतात. आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह ( Giriraj Singh) यांनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान केलंय. एका सभेत बोलताना ते मुस्लिम समाजाला ‘नमक हराम’ म्हणालेत. मुस्लिम समाज लोक कल्याणकारी योजनांचा फायदा घेतात. आयुष्यमान योजनेतून उपचार घेतात. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मते देत नाहीत. ते उपकार माणून घेत नाही. त्यामुळे आम्हाला ‘नमक हराम’ लोकांचे मतांची गरज नाही, असे वादग्रस्त विधान गिरिराज सिंह यांनी केलंय.

गिरिराज यांचे मौलवी यांना सवाल

गिरीराज सिंह हे बेगूसराय येथून भाजपचे खासदार आहेत. या रॅलीमध्ये भाषण देताना ते म्हणाले की मी एकदा एका मौलवीला विचारले की, तुमच्याकडे आयुष्मान भारत हेल्थ कार्ड आहे. लगेच त्याने हो म्हटलं. त्यावर मी विचारले कार्ड हिंदू-मुस्लिम अशा जाती धर्मानुसार वाटले जाते का ? मौलवीने नाही असे उत्तर दिले. त्याला मी विचारले तुम्ही मला मत दिले का ? त्याचे उत्तर हो होते. पण मी त्याला देवाची शपथ घेण्यास सांगितले. त्यावेळी तो म्हणाला मी तुम्हाला मत दिलेले नाही. ते उदाहरण देत गिरिराज सिंह म्हणाले, मुस्लिम समाज केंद्राचा सर्व योजनांचा फायदा घेतात. परंतु भाजपला मते देत नाही. त्यामुळे हे लोक नमक हराम आहेत. त्यामुळे मी मौलवीला म्हणाले मला नमक हराम असलेल्यांची मते नको आहेत. (Bihar Assembly Election 2025 Union Minister Giriraj Singh rematk against muslims)

एनडीएने बिहार विकास केला

मी मुस्लिम धर्मगुरुला विचारले की तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवी दिली आहे का ? तो नाही म्हणाले. पुन्हा विचारले मी तुमच्याशिवाय कधी वाईट बोललो का ? तो नाही म्हणाले. पुन्हा मी विचारले माझी काय चूक होती तुम्ही मला मते दिले नाहीत, असे गिरिराज सिंह म्हणाले. एनडीए सरकारने बिहारचा विकास केला आहे. बिहारमधील रस्ते हे केवळ एनडीएचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी बनविले गेलेले नाहीत. ते सर्व जनतेसाठीच आहेत. एनडीए सरकारने प्रत्येक समाजासाठी काम केल्याचेही त्यांनी सांगितले.

जदयूचा प्रवक्तानेही सुरात सूर मिळविले

गिरीराज सिंह यांच्या वादग्रस्त विधानाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे जदयू प्रवक्ते मृंत्युजय तिवारी यांनी विरोध केला नाही. उलट गिरीराज सिंह यांच्या सुरात सूर मिळविणारे विधान केले आहे. हे खरे आहे की लोक कल्याणकारी योजनेच्या वाटपात भेदभाव केला जात नाही. परंतु एक खास समाजाचे मते आम्हाला मिळत नाहीत. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे गिरीराज सिंह यावर बोलू शकतात, असे प्रवक्ते मृंत्यूजय तिवारी यांनी म्हटलंय.

follow us