Giriraj Singh : हिंदुंनो हलाल नाही तर झटका मटणच खा! केंद्रीय मंत्र्यांनी दिला सल्ला
Giriraj Singh : देशात सध्या कोणतं मटण खाल्लं पाहिजेत, यावरुन अनेकदा वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशात आता पुन्हा एकदा या वादात एका केंद्रीय मंत्र्याने ठिणगी टाकल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी हिंदूंना हलाल मटण खाणे सोडून देत केवळ झटका मटणच खाण्याचा सल्ला दिला आहे. झटका मटणमध्ये प्राण्यांना एकाच झटक्यात मारलं जात असल्याने तेच मटण खा. हलाल मटण खाऊन आपला धर्म भ्रष्ट करु नका, अशी प्रतिज्ञानही त्यांनी दिली आहे. बिहारमध्ये बेगुसराय मतदारसंघात त्यांनी समर्थकांना हा सल्ला दिला आहे.
#WATCH | Patna, Bihar: Union Minister Giriraj Singh says, "Sanatana Dharma has 'bali pratha' (animal sacrifice) since ages…I have said that I respect my Muslim brothers. They are so committed to their religion that they only consume halal meat…To protect and respect your… pic.twitter.com/v1W5vpAYuO
— ANI (@ANI) December 18, 2023
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, केवळ हलाल मटणच खाण्याचा निर्णय घेतलेल्या मुस्लिमांचे (Muslim) मला कौतुक आहे. आता हिंदूंनाही आपल्या धार्मिक परंपरांचे अशाच प्रकारे पालन करायला हवे. मुस्लिम समाजात झटका मटण खाल्ले जात नाही. ते केवळ हलाल मटणच खातात, त्यामुळे हिंदुंनी झटका मटण खाल्ल पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.
संसदेत अभुतपूर्व गदारोळ : एकाच फटक्यात 33 खासदारांचे निलंबन, आतापर्यंत 47 सदस्यांवर कारवाई
तसेच देशात झटका मटण विकणारी दुकाने हवी आहेत. कारण हिंदुंची प्राण्यांचा बळी घेण्याची पद्धत ही झटका पद्धत आहे. हिंदु जनावरांचा एका झटक्यात बळी घेतात. त्यामुळे आपण हलाल मटण खाऊन भ्रष्ट व्हायच नाही. जनावरांचा एका झटक्यात बळी जाईल, अशी कत्तलखाने निर्माण करायला हवीत, असंही ते म्हणाले आहेत.
Shah Rukh Khan: किंग खानच्या ‘डंकी’ला सेन्सॉरकडून मिळालं U/A सर्टिफिकेट; किती तासांचा असणार चित्रपट?
दरम्यान, बिहारमधील बेगुसराय या लोकसभा मतदारसंघात समर्थकांशी संवाद साधताना गिरीराज सिंह यांनी हा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे अनेकदा कट्टर मुस्लिमांना धारेवर धरणाऱ्या गिरीराज सिंह यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले आहे.
‘शरद पवारांमुळेच आरक्षण नाही”हेडलाईनसाठी पवारच लागतात’; सुळेंचं फडणवीसांना सडेतोड उत्तर
हलाल अन् झटका मटण नेमका फरक काय?
अनेकदा मटण खाण्यावरुन हलाल आणि झटका मटण अशी चर्चा आपण ऐकलेली आहे. मात्र, कोणते मटण खाल्ल पाहिजेत या मुद्द्यावरुन अनेकदा वाद होत असतात. गिरीराज सिंह यांच्या म्हणण्यानूसार ज्या जनावरांचा बळी एकाच झटक्यात घेतात. त्या जनावरांचे मटण झटका म्हणून ओळखलं जात, यामध्ये विजेच्या झटक्यानूसार एका झटक्यात प्राण्याला मारलं जातं.