‘शरद पवारांमुळेच आरक्षण नाही”हेडलाईनसाठी पवारच लागतात’; सुळेंचं फडणवीसांना सडेतोड उत्तर

‘शरद पवारांमुळेच आरक्षण नाही”हेडलाईनसाठी पवारच लागतात’; सुळेंचं फडणवीसांना सडेतोड उत्तर

Supriya Sule On Devendra Fadnvis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलच वादंग पेटलं आहे. या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही चांगलीच जुंपत असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे मराठा आरक्षण न मिळण्यासाठी शरद पवारच असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्याकडून करण्यात आला आहे. आत्तापर्यंत शरद पवारांनीच मराठा आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यानंतर फडणवीसांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. हेडलाईनसाठी शरद पवारच लागत असल्याचं सडेतोड प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिलं आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; ट्रक कारला धडकल्याने चौघांचा जागीच मृत्यू

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात. मागील 10 वर्षांपासून केंद्रात भाजपचंच सरकार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचंच सरकार तरी त्यांना शरद पवारच लागतात. मराठा आरक्षणासंदर्भात आपण सरकारला 24 तारखेपर्यंत वेळ दिला आहे. पुढे काय होतंय ते पाहु, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

‘महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही बिळात…’; रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं

ड्रग्ज माफीयांना सरकारचीच मदत :

मी ड्रग्जमाफीयांचा पर्दाफाश करणार असल्याचं देवेंद्र फडणवसांनी सांगितलं होतं. मी देखील सर्व राजकारण बाजूला ठेऊन ड्रग्जविरोधात आपण उभं राहु असं सांगितलं होतं. पण तसं काहीच होताना दिसत नाही. सरकारकडून काहीच स्पष्टीकरण आलं नाही. या ड्रग्ज प्रकरणात सरकार गंभीर नाही. ड्रग्जच्या लोकांना मदत सरकारच्या लोकांनी आत्तापर्यंत केली असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला आहे.

टीम इंडियासमोर आफ्रिकेची दाणादाण, 116 धावांत ऑलआऊट

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलन चालली आहेत. आपण मागचा इतिहास पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला आहे. अगदी मविआचं सरकार होतं तेव्हाही आपण सुळेंचं विधान ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं सुप्रिया सुळे नेहमीच म्हणत होत्या. ज्यांना आरक्षण देण्याची वारंवार संधी मिळाली त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हा आरक्षण देता आलं असतं. जेव्हा कोण कोणत्या यादीत आहे हे विचारत नव्हतं तेव्हा देता आलं असतं, पण त्यांना आरक्षण द्यायचं नव्हत. मराठा समाजाला झुंजवत ठेवण्यात जास्त रस होता. त्यांचं राजकारण कसं आहे लोकं झुंजवत राहिले तर आमच्याकडे नेतेपद राहिल, अशी टीका फडणवीसांनी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube