‘महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही बिळात…’; रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं
Rohit Pawar : वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क तसेच टाटा एअर बससच्या माध्यमातून येणारे हजारो कोटींचे उद्योग गुजरातला पळवल्यांनंतर आता मुंबईतील बीकेसीमधील हिरे व्यापारही गुजरातला पळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सूरतमध्ये हिरे व्यापार संकुलाचे (Diamond trading complex in Surat) उद्घाटन केले. सुरत शहराजवळील खजोद गावात 67 लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार संकुल असल्याचा दावा केला जातो. मात्र आता यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही यावर भाष्य केलं.
अदानी कालपर्यंत मित्र आज विरोधक कसे? कंबोजांनी ठाकरेंना मागितला खुलासा
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘भारत डायमंड बोर्स’ची ओळख जगातील सर्वात मोठी हिऱ्यांची बाजारपेठ अशी होती. मात्र मुंबईची ही ओळख आता पुसल्या गेली आहे. सुरतमध्ये ‘सुरत डायमंड बोर्स’ची उभारणी केली. त्याबाबत रोहित पवारांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात लिहिलं की, पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते आज सुरतमध्ये जगातील सर्वात मोठ्या ‘डायमंड बोर्संच’ उद्घाटन झालं. याबद्दल गुजरात सरकारचे अभिनंदन करावं की, मुंबईतील हिऱ्यांचा व्यवसाय डोळ्यांसमोर पळवला गेला, याचं दु:ख व्यक्त करावं हेच समजेनासं झालं, अशी खंत रोहित पवारांनी केली.
Elections 2024 : महाराष्ट्रात भाजपाचा एमपी-राजस्थान पॅटर्न? आमदार-खासदारांचं तिकीटच ‘अनसेफ’
पुढंल लिहिलं की, मुंबईतील हिरे व्यवसाय संपवून सुरतच्या हिरे व्यवसायाला ताकद दिली जात असतांना आपले सत्ताधारी खुर्च्या टिकवण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेत राहिले. खुर्चाचा मुद्दा आला की तुम्ही दिल्लीच्या पन्नास चकरा मारता, दिल्लीचे पाय धरता आणि जेव्हा महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही बिळात लपून बसता, हाच का तुमचा मराठी बाणा आणि हाच का तुमचा स्वाभिमान, असा सवालही रोहित पवार यांनी केला.
भाजपसाठी आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांसाठी केवळ सत्ता महत्त्वाची आहे का? तुमच्या लेखी महाराष्ट्राच्या अस्मितेची किंमत नाही का? अजून काय काय गहाण टाकणार? किमान महाराष्ट्रासाठी थोडा तरी स्वाभिमान तरी दाखवा, असेही रोहित पवार म्हणाले.