अदानी कालपर्यंत मित्र आज विरोधक कसे? कंबोजांनी ठाकरेंना मागितला खुलासा
Mohit Kamboj On Udhav Thackeray : गौतम अदानी कालपर्यंत मित्र होते, पण आज विरोधक कसे झाले? याचा खुलासा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केली आहे. दरम्यान, धारावी विकास प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून धारावी प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यावरुन आता मोहित कंबोज यांनी थेट उद्धव ठाकरेंना खुलासाच मागितला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ कंबोज यांनी एक्सवर शेअर केला आहे.
Adani के चार्टर प्लेन से ठाकरे परिवार को परहेज नहीं लकीन धारावी के विकास से नकली परहेज है ! pic.twitter.com/uMZPf9vFdS
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) December 17, 2023
मोहित कंबोज म्हणाले, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा धारावीच्या विकासासाठी सर्व टेंडर पास करत होते. आता अचानक ते पाठ फिरवत आहेत. धारावी विकासाला विरोध करत मोर्चा काढत आहेत. तुमची दुप्पटी भूमिका घेण्यामागे नेमकं कारण काय? कालपर्यंत गौतम अदानी तुमचे प्रिय मित्र होते, एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं मग आता तुम्ही विरोधक कसे झाले? असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे.
तसेच उद्धव ठाकरे यांचं गौतम अदानींसोबत कुठलं नातं आहे ते सर्व महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. अनेक वेळा जेव्हा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला बाहेरगावी जाण्यासाठी फ्लाईटची गरज असते तेव्हा तुम्ही अदानींच्या पर्सनल फ्लाईटने बाहेर जाता. या प्लाईटमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, रामनाथ पंडित, अजय मेहता, रावराणे आणि राजपूत हे सर्व दिल्लीला गेले होते. त्या फ्लाईटच्या तिकीटाचे पैसे तुम्ही अजून दिले आहेत का? असा सवालही कंबोज यांनी केला आहे.
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचं पुढं काय? आज आंतरवाली सराटीत निर्णायक बैठक
स्वतःच्या फायद्यासाठी गौतम अदानी यांचा वापर करून घेता आणि आता विकासाच्या वेळी त्यांनाच विरोध करत आहे. धारावीमध्ये पण आता मातोश्री 3 बांधायचयं का? म्हणून तुम्ही धारावी विकासाला विरोध करत आहात, असा आरोपही कंबोज यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुरत्याला खिसा तर नाहीच, त्यांनी मुंबई बीएमसी लुटली, आता यांच्या मनात काय आहे? विकासासाठी हे त्यांनी सर्व जनतेला सांगावं, असंही ते म्हणाले आहेत.
धारावी अदानीच्या घशात घालाल तर ठेचून काढू :
मोर्चादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले, आज धारावीत फक्त कार्यकर्ते आले, गरज पडली तर महाराष्ट्र धारावीत उतरवेन पण. धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही… या सरकारला पन्नास खोके कमी पडतात. हे असंविधानिक सरकार आहे. यांना वाटत आपल्याला कुणी जाब विचारू शकत नाही. प्रश्न अदानीला विचारला तर भाजप उत्तर देते. हे शासन तुमच्या दारी नाही, तर सरकार अदानीच्या दारी आहे. मात्र, दलालांनो, तुम्ही दलाली करून धारावी अदानीच्या घशात घालाल तर तुम्हाला चेचून-ठेचून काढू, असा इशारा ठाकरेंनी दिला.