‘उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली नसती तर अजितदादांनाही सोबत घेतलं नसतं’; तावडेंचा खळबळजनक दावा

‘उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली नसती तर अजितदादांनाही सोबत घेतलं नसतं’; तावडेंचा खळबळजनक दावा

Vinod Tawde : भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी काल भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतना तावडे यांनी पुन्हा एकदा इतिहासातील गोष्टी बाहेर काढत ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत गद्दारी केली नसती तर राष्ट्रवादीला सोबत घेतलंच नसतं, असं मोठं विधान तावडे यांनी यावेळी केलं. तावडे म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर जर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाशी गद्दारी केली नसती तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यावं लागलं नसतं. यानंतर त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांबाबत भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महायुती 48 पैकी 45 जागांवर विजय मिळवेल असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

Vinod Tawde Committee Report : भाजपचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ अहवालावर तावडेंचं स्पष्टीकरण 

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. पण ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी आमच्याशी गद्दारी केली. यामुळे काही काळानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर पुढे अजित पवारही (Ajit Pawar) सरकारबरोबर आले. उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली नसती तर अजित पवार यांना सोबत घेतलं नसतं असे तावडे यांनी स्पष्टपणे सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube