Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचं पुढं काय? आज आंतरवाली सराटीत निर्णायक बैठक

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचं पुढं काय? आज आंतरवाली सराटीत निर्णायक बैठक

Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वात आंतरवाली सराटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज होणारी बैठक महत्वाची आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सरकार काय करत आहे याची माहिती दिली. तसेच यासाठी आणखी वेळ वाढवून द्यावी, अशी विनंतीही जरांगे पाटील यांना केली होती. कायदेतज्ज्ञ मराठा आरक्षणावर काम करत आहेत. हक्काचं आरक्षण निश्चितच मिळणार आहे. फक्त मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरचा आग्रह सोडावा अशी विनंती गिरीश महाजन यांनी केली.

त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. सरकारचे दोन मंत्री येथे आले होते. त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली. आज मराठा समाजाची मोठी आणि निर्णायक बैठक होत आहे. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय, याबाबत मराठा बांधव येथे येतील. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत बैठक सुरू राहिल. दुपारी 12 वाजल्यापासून मुख्य बैठकीला सुरुवात होईल, असे जरांगे पाटील म्हणाले.

प्रसिद्धी मिळाल्यानं जरांगेंच्या डोक्यात हवा, भुजबळांना मारण्याची धमकी; समीर भुजबळांचा गंभीर आरोप

आंतरवालीतील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण आज तीन महिने झाले तरी देखील गुन्हे मागे घेतले नाहीत. तुमचा शब्द मराठा समाजाने मोडायचा नाही पण आमच्या एक एक माणसाला अटक होत आहे. नोटीसा पाठवल्या जात आहेत. कशी तुमच्याशी चर्चा करायची, असा सवाल काल मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारला होता.

राज्य सरकारने मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी मोठे काम केले आहे. त्यामुळे मराठा समाजात देखील उत्साह आहे. कुणबी असलेल्या प्रचंड नोंदी सापडल्या आहेत. पण उपोषण सोडताना ठरले होते, त्याप्रमाणे आरक्षणाचा विषय मार्गी लागला पाहिजे. कारण त्याच विषयावर उपोषण सुटले आहे. 54 लाख नोंदी सापडल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे मराठा समाज ओबीसीत असल्याने ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले होते.

Maratha Reservation संदर्भात खासदार विखेंनी केली स्पष्ट भूमिका, म्हणाले…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube