प्रसिद्धी मिळाल्यानं जरांगेंच्या डोक्यात हवा, भुजबळांना मारण्याची धमकी; समीर भुजबळांचा गंभीर आरोप

प्रसिद्धी मिळाल्यानं जरांगेंच्या डोक्यात हवा, भुजबळांना मारण्याची धमकी; समीर भुजबळांचा गंभीर आरोप

Sameer Bhujbal On Manoj jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil)यांचा मूळ मुद्दा हा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)आहे. मात्र जसजशी जरांगेंना प्रसिद्धी मिळत गेली तशी त्यांच्या डोक्यात हवा गेली की काय माहिती नाही. परंतु ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतात, ते चुकीचं असल्याचा आरोप माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal)यांनी केला आहे. समीर भुजबळ हे वर्धा येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्याला उपस्थित आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली.

कसोटी क्रिकेटमध्ये महिला संघाने रचला इतिहास, दीप्ती शर्माची घातक गोलंदाजी

यावेळी पत्रकारांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? असा सवाल केला. त्यावर समीर भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचा मूळ मुद्दा हा मराठा आरक्षणाचा आहे.

Devendra Fadanvis : मोदींच नाव आहे म्हणून गाफिल राहू नका, निवडणुकांपूर्वी फडणवीसांनी टोचले कान

त्यांनी त्या आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली पाहिजे. कसं आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे? कारण काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की, जवळपास 58 मोठ-मोठे, लाखोंच्या संख्येनं मोर्चे निघाले. शांततेत मोर्चे निघाले. सर्वांनी त्यांना सपोर्ट केला. आम्हीदेखील त्यावेळी त्यांना सपोर्ट केला.

मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः सभागृहात सांगितलं होतं की, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यानंतर वर्धामध्ये आज पहिला मेळावा होत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी समीर भुजबळांना विचारला त्यावर भुजबळ यांनी सांगितले की, काही पोलीस रिपोर्टस् आले पोलीस इनपूट आले, त्या माध्यमातून त्यांनी हे सांगितलं कारण वारंवार गेली दोन महिने झालं, तीन महिने झालं.

बीडमधील हल्ल्यानंतरसुद्धा काही पत्र येत आहेत, फोन येताहेत, व्हॉट्सअॅपवर मेसेज येत आहेत. अनेक माध्यमातून धमक्यांचे सत्र सुरु आहे. आत्तासुद्धा पोलिसांकडून काही इनपूट आले आहेत. तेच मंत्री छगन भुजबळांनी सभागृहात मांडले आहेत. हे जे चाललंय ही सर्व झुंडशाही आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हा त्यातला मूळ उद्देश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube