फसवणूक प्रकरणात मोहित कंबोजला दणका; CBI ही तोंडघशी, काय आहे प्रकरण ?
मुंबईः शंभर कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) व इतरांना न्यायालयाने दणका दिलाय. फसवणूक प्रकरणात सीबीआयने (CBI) ने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता मोहित कंबोज हा अडचणीत आले आहेत. तर आता विरोधकांनाही कंबोज व भाजपविरोधात एक मुद्दा मिळाला आहे.
दोन राज्यात काँग्रेसची बाजी, तर राजस्थानमध्ये पराभव; काय सांगतो ओपिनियन पोलचा कौल?
कंबोज व इतरांवर सेंट्र्ल बँक ऑफ इंडियाची 103 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयवंत यादव यांनी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर आदेश दिला आहेत. प्रथमदृष्ट्या सर्व आरोपींनी कट रचून बँकेची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी गुन्हा केलेला आहे. आरोपींविरोधात पूर्ण चौकशी झालेली नाही. आरोपींनी खोटे दस्ताएेवज तयार करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची फसवणूक केली आहे. सार्वजनिक पैशाचा दुरुपयोग केला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
‘बघेल सरकारचं बिंग फुटलं, महादेव अॅपच्या माध्यमातून आलेले पैसै निवडणुकीसाठी…’; दरेकरांचा हल्लाबोल
काय आहे प्रकरण ?
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक पीके जगन यांच्या फिर्यादीवरून टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापक कंबोज, तिचे संचालक, सीए यांच्याविरुद्ध बँकेची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. कंबोज व इतरांनी क्रेडिट सुविधा मिळविण्यासाठी खोटे कागदपत्रे सेंट्रल बँकेला दिली होती. त्यातून 103 कोटी रुपयांचा कर्ज घेतले होते. गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे आला होता. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला होता.
कंपनीचे संचालक व इतरांविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरावे आढळले नाहीत, असे सीबीआयने म्हटले आहे. न्यायालयाने सीबीआयच्या चौकशीवर बोट ठेवले आहे. यातील काही साक्षीदारांचे जबाब आहेत. त्यांच्या जबाबावरून आरोपींनी साहित्य खरेदी व विक्रीसाठी खोटे कागदपत्रे तयार केले. ते बँकेला दिले आहे. प्रथमदृष्टा आरोपींनी बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने दिले आहेत.