मोठी बातमी! नितीशकुमारांच्या जेडीयूत खांदेपालट; बड्या नेत्याने दिला राजीनामा, कारण काय?
Bihar Politics : केंद्रातील एनडीए सरकारमधील घटक पक्ष आणि बिहार (Bihar Politics) राज्यातील सत्ताधारी जेडीयूत मोठा फेरबदल झाला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी (KC Tyagi) यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला आहे. व्यक्तिगत कारणांमुळे मी राजीनामा देत असल्याचे त्यागी यांनी म्हटले आहे. आता केसी त्यागी यांच्या जागी राजीव रंजन यांनी राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
केसी त्यागी यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला असला तरी यामागे अनेक राजकीय कारणं आहेत ज्यांची आता चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरीच्या काळात त्यागी यांनी अशी काही वक्तव्ये केली होती ज्यामुळे पक्षातच मतभेद निर्माण झाले होते. केसी त्यागी जेडीयू पक्षाचे मोठे नेते आहेत. पण त्यांनी जी वक्तव्ये केली होती ती पार्टी लाईन सोडून होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करताच त्यांनी काही वक्तव्ये दिली होती. यामुळे पार्टीतील वरिष्ठ नेते नाराज झाले होते.
Waqf Amendment Bill : संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक; जेडीयू सेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा कडाडून विरोध
केसी त्यागी यांनी एससी, एसटी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयावर पक्षाशी कोणतीही चर्चा न करताच वक्तव्य दिले. याच पद्धतीने लेटरल एन्ट्रीच्या मुद्द्यावरही त्यांनी त्यांचं वैयक्तिक मत पक्षाचं मत असल्याचं सांगितलं होतं. त्यागी यांनी अनेकदा स्वतःचे मत पक्षाचे मत असल्याचे सांगितले होते. यामुळे पक्षाची प्रतिमा आणि नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात होते. यामुळे पक्षात अस्वस्थता वाढली होती. यानंतर पक्ष नेतृत्वाने केसी त्यागी यांचा राजीनामा स्वीकार केला.
JDU leader KC Tyagi resigns from the party spokesperson post; Rajiv Ranjan Prasad appointed as the new party spokesperson pic.twitter.com/MiWz1KtJzy
— ANI (@ANI) September 1, 2024
राजीव रंजन नवे प्रवक्ते
त्यागी यांच्या राजीनाम्यानंतर आता राजीव रंजन जेडीयूचे नवे राष्ट्रीय प्रवक्ते असतील. पक्षाचे महासचिव आफाक अहमद खान यांनी एक पत्र जारी करत या निर्णयाची माहिती दिली राजकीय जाणकारांच्या मते केसी त्यागी यांच्या राजीनाम्यामुळ पक्षात जे मतभेद निर्माण झाले होते ते आता कमी होतील. यानंतर आता जेडीयूकडून काय रणनीती आखली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आंध्रप्रदेश अन् बिहारसाठी अच्छे दिन! राहुल गांधी संतापलेच, खुर्ची बचाओ अर्थसंकल्प