Waqf Amendment Bill : संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक; जेडीयू सेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा कडाडून विरोध

Waqf Amendment Bill : संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक; जेडीयू सेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा कडाडून विरोध

Waqf Amendment Bill ; मागील काही दिवसांपासून देशात वक्फ बोर्डाची (Waqf Amendment Bill) चर्चा आहे. केंद्र सरकाकडून वक्फ बोर्ड कायद्यामध्ये सुधारणार करणार असल्याचं सांगण्यात येतंय. अशातच संसदेत आज केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्यासाठी वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 लोकसभेत सादर केलंय. या विधेयकाला एनडीच्या घटक पक्षांकडून समर्थन मिळालंय तर काँग्रेससह इतर घटक पक्षांकडून कडाडून विरोध करण्यात आलायं.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाहू लागलंय प्रेमाचं वारं; कोण पडलंय कोणाच्या प्रेमात?

किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केल्यानंतर भाजपच्या अनेक खासदारांकडून समर्थन करण्यात आलंय. तर जेडीयूचे मंत्री लालन सिंह यावेळी संसदेत बोलताना म्हणाले, वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमविरोधी नसून विरोधकांकडून मंदिरांबद्दलचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यामध्ये मंदिरांची चर्चा कुठून आली? कोणतीही संस्था निरंकुश झाली की नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी सरकार कायदे करत असते, हा सरकारचा हक्क आहे. ज्या लोकांनी शिखांची हत्या केलीयं, ते लोकं आज अल्पसंख्यांकांबद्दल बोलत आहे. विधेयकामध्ये मशिदीबाबत कोणतीही छेडछाड केलेली नसल्याचं लालन सिंह यांनी स्पष्ट केलंय.

कापलेले केस, हाताला सलाईन अन् चेहऱ्यावर निराशापूर्ण स्मित; रुग्णालयातून विनेशचा पहिला फोटो समोर….

संसदेत एकीकडे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून समर्थन दिलं जात असतानाच दुसरीकडे विरोधकांकडून मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. विधेयकावर बोलताना सपाचे अखिलेश यादव म्हणाले, अल्पसंख्याकांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. सभापती महोदय, तुम्ही या सभागृहाचे सर्वोच्च आहात. तुमचेही काही अधिकार आहेत, पण येणाऱ्या काळात ते तुमचेही काही अधिकार काढून घेतील.

Bigg Boss Marathi : नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत अन् छोटा पुढारी भिडले; कोण होणार नॉमिनेट?

वक्फ सुधारणा विधेयक म्हणजे संविधानावर मूलभूत हल्ला असून विधेयकात गैरमुस्लिमांनाही वक्फ गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य असावे अशी तरतूद करण्यात आलीयं. हा धर्मस्वातंत्र्यावरील हल्ला आहे. या विधेयकाच्या माध्यमातून जैन, ख्रिश्चन धर्मात तुम्ही पुढील काळात ढवळाढवळ कराल. लोकं आता सहन करणार नाहीत, आम्हीही हिंदू आहोत, पण इतर धर्माचा आदर करतो, या शब्दांत काँग्रेसचे खासदार के.सी. वेणूगोपाल यांनी टीका केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube