दररोज अपमान होतोय! संतापाच्या भरात सभापती निघून गेले; ‘विनेश’वरून राज्यसभेत गदारोळ

दररोज अपमान होतोय! संतापाच्या भरात सभापती निघून गेले; ‘विनेश’वरून राज्यसभेत गदारोळ

Parliament News : संसदेत आज अनेक महत्वाची विधेयके सादर होणार (Parliament News) आहेत. ज्यामध्ये वक्फ अॅक्टमध्ये संशोधन (Waqf Act) विधेयकाची सर्वाधिक चर्चा आहे. याच दरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाटचा मुद्दाही (Vinesh Phogat) चांगलाच चर्चेत आहे. या प्रकरणाचे पडसाद कालपासून देशभरात उमटत आहेत. संसदही याला (Parliament Session) अपवाद नाही. काल याच मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ झाला होता. आजही राज्यसभेत हा मु्द्दा उपस्थित होताच गोंधळाला सुरुवात झाली. विरोधकांनी आरोपांचा धडाकाच सुरू केला. यामुळे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) कमालीचे नाराज झाले. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वर्तणुकीवर संताप व्यक्त करत त्यांनी काही काळासाठी सभागृह सोडलं.

कापलेले केस, हाताला सलाईन अन् चेहऱ्यावर निराशापूर्ण स्मित; रुग्णालयातून विनेशचा पहिला फोटो समोर 

संसदेत आज विरोधकांनी पुन्हा विनेश फोगाटचा मुद्दा उपस्थित केला. गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले एकदम असं काय झालं की विनेशला थेट अपात्र घोषित करण्यात आलं पण सरकारनं काहीच केलं नाही याचं कारण आम्हाला समजलंच पाहिजे. खर्गे यांच्या या वक्तव्यानंतर टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी आरडाओरडा करत विरोध केला. यावर धनखड मात्र चांगलेच नाराज झाले.

धनखड म्हणाले सभागृहात सभापतींनाच आव्हान देण्यात आलं. माझ्याबरोबर योग्य व्यवहार झाला नाही. त्यामुळे काही काळासाठी मी येथे बसण्यास स्वतः ला सक्षम समजत नाही. विनेशच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे सगळा देशच दुःखी आहे. आता यावर राजकारण तरी करू नका. विनेशला ते सगळं काही मिळेल जे एखाद्या पदकविजेत्या खेळाडूला मिळतं. पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आता तरी या मु्द्द्यावर राजकारण करू नका असे धनखड म्हणताच टीएमसी आणि काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहातून वॉक आऊट केले.

या पवित्र सभागृहाला अराजकतेचं केंद्र बनवणं. भारतीय प्रजातंत्रावर हल्ला करणं, अध्यक्षांचा सन्मान कमी होईल असं वर्तन करणं, शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करणं विरोधकांच्या या सगळ्या गोष्टी सगळ्याच मर्यादांचं उल्लंघन करणाऱ्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सभागृहात उपस्थित आहेत. देशातील जनताही हे सगळं पाहत आहे.

सुनेत्रा पवारांचं राज्यसभा खासदार होताच मंत्रिपदावर भाष्य; म्हणाल्या, संधीचं सोनं करेल

सभागृहात चुकीच्या शब्दांचा वापर केला जात आहे. मला हे आव्हान दिलं जात नाही तर सरळसरळ सभापतींनाच दिलं जात आहे. जो व्यक्ती या पदावर बसलेला व्यक्ती या पदासाठी लायक नाही असा विचार या लोकांचा आहे त्यामुळेच हे आव्हान दिलं जात आहे, असे जगदीप धनखड म्हणाले. सभागृहाची मान कमी करू नका. बेलगाम वर्तणूक करू नका. काही खासदार चुकीची वक्तव्ये करत आहेत. मला या सभागृहाचं जितकं समर्थन पाहिजे होतं तितकं मिळालं नाही. मी प्रयत्न भरपूर केले. मी आज जे पाहिलं. खासदारांनी ज्या पद्धतीने वर्तणूक केली. त्यामुळे या ठिकाणी बसणं निदान काही काळासाठी तरी मला शक्य नाही असे म्हणत सभापती जगदीप धनखड यांनी सभागृह सोडलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube