क्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. याची आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.
एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही असं फडणवीस म्हणाले आहेत. ते एका मुलाखतीत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवू, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॅनरबाजीवरुन सुनावलंय. त्या पुण्यात बोलत होत्या.
राज्यात फाशी देण्याची पद्धत चुकलीयं, गोळी मारुन फाशी देण्यात पद्धत सुरु झाली असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलंय.
मुंबई : बदलापूर शाळेतील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा (Akshay Shinde) एन्काऊंटवर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अनेक प्रश्न उपस्थित करत हा एन्काऊंटर होऊ शकत वाही. एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारने फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलावी लागतील, असा गंभीर इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. अक्षयच्या वडिलांनी या […]
मुलांची सुरक्षा ही शाळांची जबाबदारी आहे, त्यामुळे उपाययोजना कराव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
एन्काऊंटरमध्ये बंदुकीची गोळी लागल्याने अक्षय शिंदेच्या मृतदेहातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलीयं.
बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याने आता सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास करणार आहे.
आरोपी अक्षय शिंदेला टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे होते. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कुणाचंही दुमत नाही.
बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदे घेतली आहे.