Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कारण आलं समोर
Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा पोलिसांनी एन्काऊंटर केलायं. पोलिसांनी स्वरक्षणासाठी हा एन्काऊंटर केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहेत. या प्रकरणी विरोधकांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात असताना आता अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे झालायं? याचं उत्तर समोर आलंय. एन्काऊंटरमध्ये बंदुकीची गोळी लागल्याने अक्षय शिंदेच्या मृतदेहातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलीयं.
Mumbai University Senate Election : मोठी बातमी! सिनेट निवडणुकांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
बदलापुरमधील नामंकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थीनींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. अक्षय शिंदे याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. तपास पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाची ट्रान्सफर ऑर्डर घेऊन आरोपीचा तळोजा कारागृहामधून ताबा घेतला होता. पोलिस व्हॅनमध्ये अक्षयला घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावत पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला. यावेळी स्वरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या चकमकीत अक्षय ठार झालायं.
आज गुन्हेगार म्हणून वापरला गेला..उद्या सामान्य माणसाचं काय? आंबेडकरांना वेगळाच संशय
या घटनेनंतर अक्षय शिंदे याचा मृतदहे शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालानूसार अक्षय शिंदे याच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागलीयं. अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं तब्बल 6 तास शवविच्छेदन सुरु होतं. मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली असून पाच डॉक्टरांच्या समितीने शवविच्छेदन केलं असल्याची माहिती समोर आलीयं.
बदलापुरातील एका नामंकित शाळेत 12 ऑगस्ट रोजी शाळेचा कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुकल्या मुलींवर स्वच्छतागृहात अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून उशिराने गुन्हा दाखल करण्यात आल्याने बदलापूरसह ठाण्यातील नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला. बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी आक्रोश करीत आरोपीला तत्काळा फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी आंदोलकांच्या मनधरण्या केल्या मात्र, सायंकाळच्या सुमारास या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून आलं होतं. पोलिसांनी लाठीचार्ज करीत जमावाला पांगवलं तर आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याचं दिसून आलं होतं.
दरम्यान, या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली. प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. अक्षय शिंदेवर आरोपपत्र दाखल करण्यात आले, पुढील सुनावण्यांनतर त्याला फाशी होणार अशी अपेक्षा नागरिकांना असतानाच सोमवारी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला.