Akshay Shinde : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर की हत्या? सीआयडी शोधून काढणार
Akshay Shinde Encounter : बदलापुरच्या शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde Encounter) पोलिसांच्या चकमकीत एन्काऊंटर करण्यात आलायं. या प्रकरणी सुरुवातीला अक्षय शिंदेने (Akshay Shinde Encounter) स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेत तीन गोळ्या झाडल्याने बचावासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याने आता सीआयडी गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणाचं सत्य शोधून काढण्यात येणार आहे.
बिहारमध्ये नवी दोस्ती! नितीशकुमारांचं नेतृत्व चिराग पासवानांनाही मान्य; बैठकीत मोठा निर्णय
नेमकं प्रकरण काय होतं?
बदलापुरातील एका नामंकित शाळेत 12 ऑगस्ट रोजी शाळेचा कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुकल्या मुलींवर स्वच्छतागृहात अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून उशिराने गुन्हा दाखल करण्यात आल्याने बदलापूरसह ठाण्यातील नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी आक्रोश करीत आरोपीला तत्काळा फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी आंदोलकांच्या मनधरण्या केल्या मात्र, सायंकाळच्या सुमारास या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून आलं होतं. पोलिसांनी लाठीचार्ज करीत जमावाला पांगवलं तर आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याचं दिसून आलं होतं.
Video: कुणाला वाचवण्यासाठी बदलापूर घटनेत एन्काउंटर झाला?, सुषमा अंधारेंनी थेट नावच घेतलं
या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली. प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. अक्षय शिंदेवर आरोपपत्र दाखल करण्यात आले, पुढील सुनावण्यांनतर त्याला फाशी होणार अशी अपेक्षा नागरिकांना असतानाच सोमवारी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला.
दरम्यान, घटनेनंतर जखमी अवस्थेत अक्षयला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा अक्षयचे आईवडील रुग्णालयात पोहोचले. मात्र त्यांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ‘याप्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांनी केलीयं.