मुंबईत मोठी घडामोड! तीन माजी नगरसेवकांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र; हाती घेतला धनुष्यबाण

मुंबईत मोठी घडामोड! तीन माजी नगरसेवकांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र; हाती घेतला धनुष्यबाण

Eknath Shinde Shivsena : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांचं (Eknath Shinde) ऑपरेशन टायगर जोरात सुरू आहे. ठाकरे गटातील माजी आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी धनु्ष्यबाण हाती घेतला आहे. आताही उद्धव ठाकरेंना धक्का (Uddhav Thackeray) देणारी बातमी मुंबईतून आली आहे. मुंबईतील ठाकरे गटाच्या (Mumbai News) तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांनी शिवेसनेचा भगवा त्यांच्या हाती देत पक्षात स्वागत केलं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Maharashtra Local Body Elections) दृष्टीने माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

ठाणे तसेच गोवा राज्यातील उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार दिलीप लांडे, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. या पक्ष प्रवेशाने शिवसेना वर्धापनदिनीच मुंबईत उबाठाला मोठा धक्का बसला आहे. आज उबाठाचे विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी, शाखाप्रमुख संजय जंगम, प्रभाग क्रमांक १६१ चे उबाठा गटाचे माजी नगसेवक विजेंद्र शिंदे, प्रभाग क्रमांक १४० च्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि शिवसेना युवासेना सचिव मोहसीन शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

अघोरी विद्या आम्हाला कळत नाही, मंत्री गोगावलेंचे राष्ट्रवादी अन् ठाकरे गटाला प्रत्युत्तर

गोवा राज्यातील उबाठा गटाचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेस महासचिव काशिनाथ मयेकर, पाच तालुकाप्रमुख, एक शहरप्रमुख, विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ठाण्यातील रामचंद्रनगर शाखेचे उबाठाचे उपविभागप्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत सामील झालेल्या लोकप्रतिनिधींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या प्रभागांतील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, या पक्षप्रवेशाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत ताकद मिळाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतण्याची तयारी शिंदे गटाकडून केली जात आहे. यात आता ठाकरे गटातील नेते पक्षात प्रवेश करत असल्याने शिंदे गटात उत्साहाचं वातावरण दिसत आहे.

“एसआयटीमार्फत ‘त्या’ प्रकाराची चौकशी करा”, PDCC बँक प्रकरणी सुप्रिया सुळेंची मागणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube