“एसआयटीमार्फत ‘त्या’ प्रकाराची चौकशी करा”, PDCC बँक प्रकरणी सुप्रिया सुळेंची मागणी

“एसआयटीमार्फत ‘त्या’ प्रकाराची चौकशी करा”, PDCC बँक प्रकरणी सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule On PDCC Bank Open Till 11 PM Voter list found in bank : बारामतीत सध्या पीडीसीसी (PDCC Bank) बँकेवरून वातावरण तापलंय. बँक रात्रीचे अकरा वाजले तरी देखील उघडी होती, असा आरोप देखील करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात (Pune Politics) याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. युगेंद्र पवार यांनी सडकून टीका केली होती. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) थेट एसआयटी नेमून चौकशीची मागणी केली आहे. खा. सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले.

सुळे म्हणाल्या, मला वाटतं या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. बँकेच्या मॅनेजरनेच पोलिसांत तक्रार दाखल केली पाहिजे. तेथील सगळे व्हिडिओ फुटेज पोलिसांना दिले पाहिजेत. शाखा व्यवस्थापकाला माहिती नसताना बँक उघडलीच कशी हाच पहिला गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी समिती गठीत केली पाहिजे. पारदर्शकपणे चौकशी करा. वेळ संपल्यानंतर बँक उघडलीच कशाला? जर बँक उघडली असेल तर मॅनेजरला माहिती कसं नाही? बँकेतील जे व्हिडिओज आहेत ते पोलीस, एसआयटी आणि पीडीसीसी बँकेच्या प्रत्येक भागधारकारला मिळाले पाहिजेत.

Baramati Politics : PDCC बॅंक रात्री उशिरापर्यंत का सुरू होती? युगेंद्र पवारांची आगपाखड, पैशाचा वापर…

या प्रकारची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे मी स्वतःच याची मागणी करणार आहे. देशात कुठेच असं घडता कामा नये. बँकिंग सिस्टीम जर पारदर्शक करतोय असे म्हटले जात असेल तर आणि अशा घटना घडत असतील तर ते चुकीचंच आहे. पीडीसीसी बँकेची एक वेगळी ओळख आहे. आशिया खंडातील एक मोठी बँक आहे. बँकेची मालकी शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना माहिती आहे का की येथे नेमकं काय झालं आहे? कुणी हा निर्णय घेतला? याद्या तिथे पोहोचल्या कशा? तिथे कोण कोण येऊन गेलं? कुणी फोन वापरले? कुणी कॉम्प्यूटर वापरले? तेथील जे व्हिडिओ फुटेज आहेत ते त्यांनी पारदर्शकपणे नाबार्डला दिले पाहिजेत. मला विश्वास आहे की याबाबतीत आरबीआय नक्कीच नाबार्डला विचारणा करील की हे नक्की काय चाललं आहे?

बँकेतील व्हिडिओ फुटेज तपासा

विरोधकांनी आरोप केला आहे की ज्यावेळेला हे सगळं प्रकरण झालं त्यावेळी अजित पवारांचे खासगी पीए असतील, दत्तात्रय भरणेंचे पीए देखील त्या ठिकाणी हजर होते. यात प्रामुख्याने एक सरकारी अधिकारी आहे तो सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता. हा अधिकारी शेतकऱ्यांना धमकावण्याचं काम करतोय असा आरोप विरोधकांनी केला आहे असे विचारले असता सुळे म्हणाल्या, मला या प्रकाराची माहिती नाही पण या प्रकाराची नक्कीच चौकशी झाली पाहिजे. यासाठी एक एसआयटी गठीत करा आणि जे जे आरोप झाले आहेत त्याची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. सगळी बँक कॅमेऱ्यांच्या निगराणीत असते. त्यामुळे सगळे व्हिडिओ फुटेज आपल्याला मिळाले पाहिजेत. यापेक्षा पीडीसीसी बँकेतील जो गुंतवणूकदार आहे त्या प्रत्येकाला याचं उत्तर मिळालं पाहिजे.

मंत्री गोगावलेंचा ‘अघोरी’प्रताप, राऊतांनी केली CM फडणवीसांची कानउघडणी…’खुर्चीखाली वाकून पाहा’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube