अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, आव्हाडांच्या दाव्यावर धस संतापले, ‘हे स्टेटमेंट…’

  • Written By: Published:
अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, आव्हाडांच्या दाव्यावर धस संतापले, ‘हे स्टेटमेंट…’

Suresh Dhas : बदलापूर येथील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याने बलात्कार केलाच नसल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हा (Jitendra Awhad) यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान आव्हाड यांनी हा दावा केला आहे. मात्र, त्यांच्या या दाव्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) नाराजी व्यक्त केली आहे.

मोठी बातमी : शरद पवारांची तब्येत बिघडली; पुढील चार दिवसांचे सर्व दौरे रद्द 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी न्याय मिळण्याच्या मागणीसाठी आज मुंबईत जनआक्रोश मोर्चा निघाला आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी आमदार धस मुंबईत आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी अनेक विषयांवर भाष्य केलं. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता धस म्हणाले की, आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अक्षय शिंदे याच्याबद्दल केलेले स्टेटमेंट मला आवडलेले नाही. मला काही त्यांच्याशी भांडण करायचं नाही. मात्र, त्यांचे स्टेटमेंट मला आवडलं नाही. गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरू असलेल्या मोर्चांमध्ये आव्हाड हे आमच्यासोबत आहे. मात्र तरी देखील या मोर्चा त्यांनी केलेलं विधान आपल्याला आवडलं नाही, असं धस म्हणाले.

नाराज भुजबळ BJPमध्ये प्रवेश करणार का? भाजपचा बडा नेता म्हणाला, ‘त्यात काय गैर…’ 

वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याच्या एसआयटीच्या हालाचालींबद्दल विचारलं असता धस म्हणाले, वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त व्हायलाच हवी. कारण अनेक धागेदोरे यातून समोर येतील. ही सगळी संपत्ती एकट्या आकाच्या नावावर नाही. आका-बाका-चोखा-सखा या सर्वांच्या नावावर आहे. या सगळ्या प्रॉपर्टीज आकाच्या अॅटेचमेंटमध्ये आल्या पाहिजे, असं धस यांनी म्हटलं.

…तेव्हाच जनतेचा राग शांत होणार
तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण उज्जवल निकम यांच्याकडे देण्यात यावं अशी मागणी आमची मागणी आहे. त्याबाबत सरकार सकारात्मक आहे. पण या हत्या प्रकरणातील सर्व ज्या दिवशी फाशीवर जातील, तेव्हाच राज्यातील 14 कोटी जनतेच्या मनातील राग शांत होईल, असंही धस म्हणाले.

आव्हाड काय म्हणाले होते?
अक्षय शिंदेला मारला. त्याची निर्घृणपणे हत्या झाली. जेव्हा सरकारी यंत्रणा पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करते तेव्हा पोलिसच बदनाम होतात. त्याच्या हातात बेड्या होत्या. त्याला जवळून मारलं. तो रिव्हॉल्व्हर कसा ओढणार? रिव्हॉल्व्हरवर त्याच्या हाताचे ठसे नाहीत. लोक अक्षय शिंदे बद्दल बोलायला तयार नाहीत. ते घाबरत आहेत. बलात्काराची केस आहे, समाज अंगावर येईल अशी लोकांना भीती वाटते. पण अरे, अक्षय शिंदेने बलात्कारच केला नाही. बलात्कार करणाऱ्यांना सोडण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली, असं आव्हाड म्हटलं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube