Akshay Shinde Encounter : मुलांची सुरक्षा ही शाळांची जबाबदारी; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांच्या सचिवांना आदेश
Akshay Shinde Encounter : बदलापुरातील नामंकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळलीयं. या घटनेनंतर एका सुनावणीदरम्यान, मुलांची सुरक्षा ही शाळांची जबाबदारी आहे, त्यामुळे उपाययोजना कराव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
सोनम कपूर पॅरिसमध्ये क्रिश्चियन डिओर स्प्रिंग-समर 2025 वीमेंसवियर शोमध्ये चमकली
बदलापूर घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात यावेत, या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयात बचपन बचाओ आंदोलन या एनजीओने दाखल केली. या याचिकेवर न्या. बीव्ही नागरथना यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. यावेळी देशातील सर्व राज्यांच्या मुलींच्या सुरक्षेबाबत आदेश देण्यात आले आहेत.
मुलांची सुरक्षा ही शाळांची जबाबदारी असून त्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असं न्यायालयाने आदेशात स्पष्ट केलंय. हा आदेश सर्व राज्यांना लागू असणार आहे. त्यामुळे अत्याचाराच्या घटनांवर आळा बसणार असल्याचं दिसून येत आहे.
बदलापूर प्रकरण नेमकं काय?
बदलापुरातील एका नामंकित शाळेत 12 ऑगस्ट रोजी शाळेचा कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुकल्या मुलींवर स्वच्छतागृहात अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून उशिराने गुन्हा दाखल करण्यात आल्याने बदलापूरसह ठाण्यातील नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला. बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांनी आक्रोश करीत आरोपीला तत्काळा फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी आंदोलकांच्या मनधरण्या केल्या मात्र, सायंकाळच्या सुमारास या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून आलं होतं. पोलिसांनी लाठीचार्ज करीत जमावाला पांगवलं तर आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याचं दिसून आलं होतं.