सोनम कपूर पॅरिसमध्ये क्रिश्चियन डिओर स्प्रिंग-समर 2025 वीमेंसवियर शोमध्ये चमकली

  • Written By: Published:
सोनम कपूर पॅरिसमध्ये क्रिश्चियन डिओर स्प्रिंग-समर 2025 वीमेंसवियर शोमध्ये चमकली

Sonam Kapoor : ग्लोबल फॅशन आयकॉन सोनम कपूरने (Sonam Kapoor) पॅरिसमध्ये आयोजित क्रिश्चियन डिओर स्प्रिंग-समर 2025 वीमेंसवियर (Christian Dior Spring-Summer 2025) शोमध्ये आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांची मने जिंकली.

क्रिश्चियन डिओर क्रूझ 2025 कलेक्शनमधील स्टायलिश काळा ड्रेस घालून सोनमने पुन्हा एकदा आपल्या फॅशन सेन्सचा ठसा उमटवला. हा प्रतिष्ठित आणि ग्लोबल फॅशन कॅलेंडरमधील अत्यंत महत्त्वपूर्ण इव्हेंट असून, सोनम त्यात उपस्थित असलेली एकमेव भारतीय सेलिब्रिटी होती. सोनमने काळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये खांद्यावर नाजूक फुलांच्या भरतकामाने सजवलेला टेलर्ड ट्रेंच कोट, विस्तीर्ण स्कर्ट आणि स्ट्रक्चर्ड कॉर्सेटचा समावेश होता. तिच्या लूकने आधुनिक स्टाइल आणि पॅरिसच्या इतिहासाचा उत्तम संगम दाखवला.

WhatsApp Image 2024 09 24 At 7.05.34 PM

चेन डिटेल्स असलेल्या बोल्ड कॉम्बॅट बूट्ससह सोनमचा लूक एका वेगळ्या आणि सशक्त अॅस्थेटिकचा नमुना ठरला. डिओरच्या कालातीत कलाकुसर आणि आधुनिक डिझाइनचे मिश्रण असलेल्या या पोशाखाने फॅशनमधील त्यांच्या स्वतंत्र दृष्टिकोनाला अधोरेखित केले. या शोमध्ये सहभागी होताना सोनम कपूर म्हणाली “डिओरने नेहमीच क्रिएटिविटी आणि एलिगन्सच्या सीमा ओलांडल्या आहेत, आणि त्यांच्या या दृष्टिकोनाला साकारताना पाहणे हा एक सन्मान आहे.

हे कलेक्शन त्याच्या जटिल कलेच्या कामगिरीसह आणि वारशाच्या अनोख्या साजशृंगारासह एक कलाकृती होती. प्रत्येक डिओर शो हा कला आणि फॅशनचा प्रवास असतो, आणि आजचा इव्हेंट त्याचं उत्तम उदाहरण आहे. या मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान वाटतो, जिथे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.”

WhatsApp Image 2024 09 24 At 7.05.35 PM

 

रेड लिपस्टिक अन् बोल्ड फोटो, सई ताम्हाणकरचा मोहक लुक पाहायला का?

सोनम कपूरची या शोमधील उपस्थितीने डिओरसोबतच्या तिच्या दीर्घकालीन संबंधांना आणखी बळकटी दिली आहे. बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून सोनमचे नाव आजही प्रस्थापित असून, ती निःसंशय भारतातील फॅशन जगतातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube