‘आयशा’ला 15 वर्षे पूर्ण! सोनम कपूरकडून खास आठवणींना उजाळा, बॉलीवूडची फॅशन आयकॉन…

Film Aisha Completes 15 Years Today : बॉलीवूडमधील (Bollywood) आयकॉनिक स्टाईल फिल्म आयशाला (Film Aisha) आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत. 6 ऑगस्ट 2010 रोजी प्रदर्शित झालेली ही फिल्म हळूहळू कल्ट क्लासिक ठरली. विशेषतः फॅशनप्रेमी आणि तरुण प्रेक्षकांमध्ये. रिया कपूरच्या निर्मिती क्षेत्रातल्या पदार्पणाची ही फिल्म होती, ज्यात सोनम कपूर (Sonam Kapoor), अमृता पुरी आणि इरा दुबे मुख्य (Entertainment News) भूमिकेत होते. दिग्दर्शन राजश्री ओझा यांनी केलं होतं.
या निमित्ताने सोनम कपूरने आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं, आयशा करताना आमचं उद्दिष्ट कधीच ‘संस्कृतीवर प्रभाव’ टाकण्याचं नव्हतं. आम्ही दोन मुली होतो, ज्यांना एक अशी फिल्म बनवायची होती, जी आम्हाला प्रेक्षक म्हणून पाहायला आवडेल. जी त्या काळात बॉलिवूड तयार करत नव्हता. लोकांनी ती फिल्म पाहून आम्हाला जाणीव करून दिली की, आयशा तरुणाईसाठी एक पिढी-परिभाषित फिल्म बनली होती.
फॅशनला दिलं केंद्रस्थान
फिल्म करताना आम्हाला माहीत होतं की, आम्हाला फॅशनशी खेळायचं आहे, ती आकर्षक आणि लोकांना सहज पोहोचणारी बनवायची आहे. आमचं दोघींनाही फॅशन आवडत होती, आणि लोक त्यामध्ये रस घेत होते, पण याआधी अशी कोणतीही फिल्म नव्हती जिथे फॅशन इतक्या ठामपणे केंद्रस्थानी होती. आम्हाला ही माहीत नव्हतं की आयशा सिनेमावर, तरुणाईच्या मानसिकतेवर आणि पॉप कल्चर वर इतका परिणाम करेल.”
बॉलीवूडमध्ये फॅशनचं स्थान बदललं
आयशाने बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच फॅशनला पार्श्वभूमीऐवजी मध्यभागी आणलं. या फिल्मने स्टाईल आणि स्वतःच्या अभिव्यक्तीबद्दल मुख्य प्रवाहात संवाद सुरू केला. ही एक अशी गोष्ट आहे जी, मी कायम समर्थन करत आले आहे.
अमृताचा पहिला-वहिला राज्य चित्रपट पुरस्कार! चंद्रमुखीसाठी झाला गौरव; पाहा खास फोटो
आयशा प्रत्येक तरुण मुलीची ओळख
म्हणूनच मला वाटतं की, आजही आयशा माझ्या हृदयात एक खास स्थान राखून आहे. माझ्या पिढीतील प्रत्येक मुलीच्या हृदयातसुद्धा. तिचं पात्र असं आहे, जे प्रत्येक तरुण मुलीला स्वतःला शोधताना प्रतिबिंबित करतं. स्टाईलिश, हुशार, पण एकटी, अधुरी आणि प्रेमाच्या शोधात. त्यामुळेच कदाचित आयशा आजही पॉप कल्चरमध्ये, वॉर्डरोबमध्ये आणि हृदयात जिवंत आहे. हेच आमच्यासाठी आजचं सर्वात मोठं गिफ्ट आहे. ‘आयशा’ ची सहनिर्मिती रिया कपूर, अनिल कपूर आणि सुनील मनचंदा यांनी केली होती.