‘जैत रे जैत’ ! 48 वर्षांचा सांगीतिक ठेवा पुण्यात खुलला, पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांना अभिवादन

‘जैत रे जैत’ ! 48 वर्षांचा सांगीतिक ठेवा पुण्यात खुलला, पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांना अभिवादन

Grand Musical Event 48th anniversary of film Jait Re Jait : मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिजात कलाकृती म्हणून ओळखला जाणारा ‘जैत रे जैत’ (Jait Re Jait) या चित्रपटाच्या 48 व्या वर्धापनदिनानिमित्त एक खास सांगीतिक महोत्सव पुण्यात (Grand Musical Event) साजरा करण्यात आला. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित (Entertainment News) या समारंभात, मेहक प्रस्तुत या कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांच्या हृदयाला भिडणारा सांगीतिक अनुभव दिला. या विशेष कार्यक्रमात पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव (Pune News) करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पॅनल चर्चेने झाली, ज्यात सहभागी होते, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे. मृणाल कुलकर्णी, संध्याकाळचे सूत्रसंचालन स्पृह जोशी यांनी अत्यंत भावस्पर्शी आणि नेमकेपणाने केले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या संगीत प्रवासाविषयी सांगताना उल्लेख केला, मी ही गाणी दाद मिळवण्यासाठी नव्हे, तर एका न ऐकलेल्या आवाजाला मान देण्यासाठी रचली होती. जैत रे जैत हे माझं एकट्याचं नव्हे — ते जंगलाचं आहे, विसरलेल्या लोकांचं आहे.

नियुक्ती मागे घ्या, न्यायालयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होईल; आरती साठेंच्या नियुक्तीवरून रोहित पवार आक्रमक

उषा मंगेशकर यांनी त्या काळातील निर्मितीच्या आठवणींना उजाळा दिला. एका धैर्यशील कलाकृतीच्या निर्मितीमागील संघर्ष उलगडला. आदिवासी कथांना पडद्यावर आणण्यामागील प्रयत्नांचे तपशील शेअर केले, तर डॉ. मोहन आगाशे यांनी नाग्या या त्यांच्या भुमिकेतील अनुभव सांगितले.या चर्चेनंतर जैत रे जैत मधील अजरामर गाणी प्रत्यक्ष स्वरात सादर करण्यात आली. रवींद्र साठे यांच्या सुरेल नेतृत्वात, मनिषा निश्चल आणि विभावरी आपटे यांनी या गीतांना नवसंजीवनी दिली.

Kabutar Khana Dadar : शांतीचे प्रतीक असलेले कबुतर आरोग्यासाठी किती धोकादायक? जाणून घ्या

मी रात टाकली, जांभुळ पिकल्या झाडाखाली, आम्ही ठाकर ठाकर ही गाणी केवळ ऐकली गेली नाहीत, ती अनुभवली गेली. त्या सूरांनी सभागृह भारावून टाकले. जैत रे जैत पुन्हा एकदा सिद्ध करून गेलं की, हा चित्रपट नव्हे, एक चळवळ आहे. एक सांस्कृतिक जप आहे. आणि हा कार्यक्रम झाला एक सांगीतिक साक्ष, त्या लढ्याची, त्या संगीताची, आणि त्या मातीची. कारण काही गाणी फक्त गायली जात नाहीत, ती जपली जातात. काही कलाकार हे केवळ कलाकार नसतात, ते संस्कृतीचे रक्षक असतात.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube