बदलापूर पुन्हा हादरलं! चार वर्षीय विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण; नेमकं काय घडलं?
ठाण्यातील बदलापूर पुन्हा एकदा हादरुन गेलंय. बदलापूरमध्ये 4 वर्षीय विद्यार्थिनीचं शाळेच्या व्हॅनचालकाकडून लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आलीयं.
Badlapur News : ठाण्यातील बदलापूर पुन्हा एकदा हादरुन गेलंय. बदलापूरमध्ये 4 वर्षीय विद्यार्थिनीचं शाळेच्या व्हॅनचालकाकडून लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आलीयं. या घटनेनंतर पुन्हा एकदा बदलापुरात तणावाचं निर्माण झालं असून या व्हॅनचालकाने शाळेच्या व्हॅनमध्येच विद्यार्थिनीचं लैंगिक शौषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शाळेतून घरी पोहोचल्यानंतर विद्यार्थिनीने कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलायं. या घटनेप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलीयं.
विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत असताना चालकाने हे कृत्य केलंय. घरी पोहोचल्यावर मुलीने आईवडिलांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेनंतर बदलापुरकरांना संताप अनावर झाल्याने स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला. यावेळी बदलापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
साताऱ्यातील शिंदेंच्या शिवसेनेला घरचा आहेर; शिवसेनेच्या आमदाराने पत्नीला मिळवून दिली भाजपची उमेदवारी
चालकाने शाळेतून घरी परतताना चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर वाहनातच अत्याचार केला. बसमध्ये फक्त चालक आणि मुलगी असल्याने त्याने ही कृत्य घडले. मुलीला घरी पोहोचल्यानंतर तिच्या वर्तनात बदल दिसल्याने पालकांना संशय आला आणि त्यांनी तपास केल्यावर ही धक्कादायक बाब उघड झाली. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी वेगवान कारवाई केली. त्यांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर सखोल चौकशी सुरू केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया चालू आहे.
