अक्षय शिंदेचं एन्काऊंटर फेक; वाचा 655 प्रकरणात किती पोलिसांना शिक्षा
Fake Encounter Cops Convicted : बदलापूरच्या (Badlapur) एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर ऑगस्ट 2024 मध्ये लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा 23 सप्टेंबर 2023 रोजी पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता मात्र एन्काउंटर फेक (Fake Encounter) असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशीसाठी मजिस्ट्रेट चौकशीचे आदेश देण्यात आले होते. 20 जानेवारी 2025 ला मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला.
या अहवालात एन्काऊंटर फेक असल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आला आहे. एन्काऊंटर फेक असल्याचे सिद्ध झाल्याने या प्रकरणात पाच पोलिसांना दोषी ठरवण्यात आले आहे.
सोमवारी मॅजिस्ट्रेट अशोक शेंगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सीलबंद लिफाफ्यात या प्रकरणात अहवाल सादर केला. त्यांनी या अहवालात फॉरेन्सिक अहवालासह सर्व पुरावे विचारात घेतल्यानंतर त्यांनी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला असं सांगितले आहे.
अक्षय शिंदेच्या वडिलांनी दाखल केली याचिका
पोलिसांनी फेक एन्काऊंटरमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करणारी याचिका अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू असून मॅजिस्ट्रेट अशोक शेंगडे यांनी दिलेल्या अहवालानंतर खंडपीठाने तपासाच्या आधारे गुन्हा नोंदवणे सरकारचे कर्तव्य असं म्हटले आहे. तसेच चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी पाच पोलिस जबाबदार आहेत. कायद्यानुसार, पाच पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी. असं देखील खंडपीठाने म्हटले.
अक्षय शिंदेच्या मृत्यूला जबाबदार पोलीस कोण ?
या घटनेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) नीलेश मोरे, हेड कॉन्स्टेबल अभिजीत मोरे आणि हरीश तावडे आणि एक पोलिस चालक यांचा समावेश होता.
नेमकं प्रकरण काय?
ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूरमधील एका शाळेच्या शौचालयात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. तर 23 सप्टेंबर रोजी तळोजा तुरुंगातून चौकशीसाठी नेत असताना पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर 2 गोळ्या झाडले तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर तीन गोळ्या झाडले असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता.
तर दुसरीकडे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर गेल्या काही वर्षात संपूर्ण देशात फेक एन्काऊंटरची संख्या वाढली आहे. 2023 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, यूपी पोलिसांनी 6 वर्षांत 10,000 हून अधिक एन्काऊंटर केले त्यापैकी अनेक फेक होते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2017 ते 2022 या काळात देशात एकूण 655 फेक एन्काऊंटर झाले आणि त्यापैकी 117 फेक एन्काऊंटर उत्तर प्रदेशमध्ये झाले आहे मात्र या फेक एन्काऊंटरमध्ये किती पोलीस कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
फेक एन्काऊंटर या पोलिसांना शिक्षा झाली
2006 मध्ये एटा येथे झालेल्या फेक एन्काऊंटरमध्ये गाझियाबादच्या सीबीआय न्यायालयाने 9 पोलिसांना दोषी ठरवले होते. त्यापैकी पाच पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती तर चार पोलिसांना प्रत्येकी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती तसेच 1992 मध्ये पंजाबमधील तरनतारन येथे दोन तरुणांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांच्यावर देखील फेक एन्काऊंटर करण्यात आले होते. ज्यामध्ये आता सीबीआय न्यायालयाने पंजाब पोलिसांच्या माजी एसएचओसह 3 पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
2009 मध्ये, नोकरीच्या शोधात देहरादून येथे आलेल्या एका तरुणाचा फेक एन्काउंटर करण्यात आला. या प्रकरणात 17 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 1998 मध्ये, बिहारमधील पूर्णिया येथे फेक एन्काऊंटरच्या आरोपाखाली विशेष सीबीआय न्यायालयाने अनेक पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
Raigad Guardian Minister: रायगडचे पालकमंत्री कोण? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं