वादग्रस्त उपदेशक झाकीर नाईकला पाकनंतर बांगलादेशात रेड कार्पेट; शेख हसीनाचे सरकार गेल्यानंतर भूमिका बदलली

Zakir Naik: 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या दरम्यान बांगलादेशचा दौरा तो करणार आहे. या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे कार्यक्रम होणार आहे.

  • Written By: Published:
Bangladesh to give red carpet welcome to Zakir Naik

Bangladesh to give red carpet welcome to Zakir Naik: भारतासाठी हवा असलेला वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकीर नाईक ( Zakir Naik) याच्याबाबत आता बांगलादेशने (Bangladesh) आपली भूमिका बदलली आहे. शेख हसिना यांचे सरकार असताना झाकीर नाईक याला बांगलादेशने बंदी घातली होती. परंतु येथील हंगामी सरकारने ही बंदी उठविली आहे. आता त्या़चे बांगलादेशमध्ये स्वागत केले जाणार आहे.त्यामुळे आता भारत सरकारच्या चिंता काहीशा वाढलेल्या आहेत. झाकीर नाईक हा तब्बल एक महिना बांगलादेशचा दौरा करणार आहे. 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या दरम्यान बांगलादेशचा दौरा तो करणार आहे. या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे कार्यक्रम होणार आहे.


नऊ वर्षापूर्वी बंदी घातली होती

झाकीर नाईकला 2016 मध्ये बांगलादेशमध्ये बंदी घातली होती. बांगलादेशची राजधानी ढाका येथे 2016 मध्ये आर्टिसन बेकरीवर आतंकवादी हल्ला झाला होता. त्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 17 विदेशी नागरिक होते. बॉम्बस्फोट घडलेल्या भागात अनेक देशांचे दूतावास होते. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी जाकीर नाईक आणि त्यांच्या पीस टीव्ही चॅनलवर बंदी घातली होती. (Bangladesh to give red carpet welcome to Zakir Naik)

Video : राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे मी असमाधानी; शाहंच्या विधानामुळे नव्या भिडूची चर्चा


झाकीर नाईकचे व्हिडिओ बघून हल्ला

यात अनेक दहशतवादी अटक करण्यात आले होते. ते सर्वजण श्रीमंत घरातील होती. युट्यूबर झाकीर नाईक याचे उपदेश एेकल्यामुळे ते प्रभावित झाले होते. त्यानंतर झाकीर नाईक भारतातून पळाला होता. त्याच्यावर भारतामध्ये वादग्रस्त भाषण करणे आणि शांतता बिघडविणे असे आरोप आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने त्याच्याविरुद्ध यूएपीएनुसार गुन्हा दाखल केला आहे. झाकीर नाईक हा सध्या मलेशियामध्ये राहत असल्याचे बोलले जात आहे. अनेकदा भारत सरकारने मलेशिया सरकारकडून झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचे मागणी केली आहे.

डॉ. संपदा मुंडे हत्या प्रकरण! हॉटेच्या रूममधलं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती, नक्की काय घडलं?

पाकिस्तानचा नाईकला स्वाफ्ट कॉर्नर
गेल्या वर्षीच झाकीर नाईकला पाकिस्तानने पायघड्या घातल्या होत्या. त्याने पाकमधील लश्कर ए तयब्बाचे कमांडर मुजम्मल इकबाल हाशमीबरोबर बैठक घेतली होती. त्याला अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याने पाकिस्तानमध्ये दीड लाख लोकांना संबोधित केले होते.

follow us