Video : राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे मी असमाधानी; शाहंच्या विधानामुळे नव्या भिडूची चर्चा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत.

  • Written By: Published:
Video : राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे मी असमाधानी; शाहंच्या विधानामुळे नव्या भिडूची चर्चा

Amit Shah On Maharashtra Double Engine Government : राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या डबल इंजिन सरकारमुळे तुम्ही समाधानी असाल पण मी नाही असे थेट विधान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. ते मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या (Maharashtra BJP) नव्या प्रदेश मुख्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.  शाह यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा भिडू सहभागी होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी शाह यांनी राज्यात ट्रिपल इंजन सरकार पाहिजे असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत विरोधकांचा असा सुपडा साफ करा की ते दुर्बिण लावूनही सापडता कामा नये.

राज्यात भाजप कुबड्यांच्या आधारे नव्हे तर, मजबूत बहुमतावर

जो पक्षाच्या सिद्धांतावर चालतो, ज्याच्यात कामगिरी करण्याची ताकद आहे तोच भाजपात मोठा नेता बनू शकतो. कामगिरीच्या बळावरच देशाचे नेतृत्व ठरेल. घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही. नरेंद्र मोदी हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक जिल्ह्यात डिसेंबर २०२६ पर्यंत भाजपाचं कार्यालय असायला हवे अशा सूचनाही यावेळी शाह यांनी केल्या. राज्यात भाजपा कोणत्याही कुबड्यांचा आधारे नाही तर आपल्या मजबूत बहुमतावर चालत आहे. बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल. भाजपासाठी कार्यालय म्हणजे मंदिरच आहे. Amit Shah On Maharashtra Double Engine Government

Video : …तर तिसऱ्या अंकात राजकीय चिरफाड; जैन मुनींच्या भेटीनंतर धंगेकरांनी सांगितला पुढचा अजेंडा

भाजप काचेच्या घरात राहत नाही : फडणवीस 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवक निशाणा साधला. या जागेत अनेक अडचणी होत्या. एक-एक अडचण आम्ही दूर केली. हळूहळू ही जागा आपण मिळवली काही लोकांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उभं केले,  मुंबईत चांगलं प्रदेश कार्यालय असावं अशी आमची इच्छा होती’ जागा बळकावण्याची सवय असणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये असं म्हणत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाजप काचेच्या घरात राहत नाही, हमारे उपर पत्थर फेकने का प्रयास मत करना असा टोला वजा इशाराही विरोधकांना फडवीसांना दिला.

follow us