मराठे फडणवीसांचा कार्यक्रम लावणार, वेळ पडली तर भाजपचा एन्काउंटर…; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहे. आज पुन्हा एकदा जरागेंनी भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी फडणवीसांना इशाराही दिला. वेळ पडली तर मराठे त्यांच्या भापजचा एन्काउंटर करणार, असं विधान जरांगेंनी केलं.
‘म्हणून…जयंत पाटलांना जबाबदारी दिली’, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांचा कार्यक्रम करणार…
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
यावेळी त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ही लाट आहे. याला गर्दी म्हणू नका. ही लाट देवेंद्र फडणीस यांचा कार्यक्रम लावणार आहे. या मन:स्थितीत फडणवीसांनीच जायला भाग पाडले. जो समाज त्यांच्या बाजूने होता, त्यांची मुडदे फडणवीसांनी पाडली. फडणवीस हा देशातील सर्वात डागी माणूस आहे. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा होती, पण त्यांनी विष आमच्या नरड्यात ओतलं, असा हल्लाबोल जरांगेनी केला.
भाजपचा एन्काउंटर करणार…
फडणवीस यांनी जातांना खुन्नस दिली आणि मला मराठ्यांशी काही देणं घेणं नाही हे दाखवलं. त्यांनी असे वार केले की, त्या वारांनी समाजाचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालंय, धनगर आरक्षणाचा निर्णय फडवणीस यांनी घेतला आणि तो त्यांनीच रद्द केला. आता वेळ पडली तर मराठे त्यांच्य्या भाजपचा एन्काउंटर करणार, असा घणाघात जरांगेंनी केला.
जरांगेंकडे 1800 अर्ज…
विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले की, आमच्याकडे 1800 अर्ज आले आहेत. अजून काही ठरलेलं नाही. मात्र, इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यांच्याशी चर्चा केली. आपल्याला 95 टक्के समाजकारण आणि 5 टक्के राजकारण करायचे आहे. विधानसभेबाबत आम्ही 20 तारखेला निर्णय घेणार आहे, असं जरांगे म्हणाले.
अनेक नेते जरांगेंच्या भेटीला…
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे सत्ताधारी पक्षांना मोठे नुकसान सहन करावे लागले. यानंतर आता जरांगे स्वतः मराठा समाजाचे उमेदवार विधानसभेत उतरवणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक राजकीय पक्षांना धडकी भरली. त्यामुळं आतापर्यंत अनेक आजी-माजी आमदारांनी अंतरवली सराटीला जाऊन जरांगेंची भेट घेतली.