तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवू; बॅनरबाजीवरुन सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना सुनावलं

तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवू; बॅनरबाजीवरुन सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना सुनावलं

Supriya Sule On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) तुम्ही बंदूक दाखवा आम्ही संविधान दाखवू, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलंय. दरम्यान, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर ठाण्यात फडणवीस यांच्या हाती बंदूक दाखवत बॅनरबाजी करण्यात आलीयं. या बॅनरवाजीवरुन सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना सुनावलंय. पुण्यात आज निधी मिळत नसल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं , त्याची पोस्टरबाजी करणे हे माझ्यासारख्या महिलेला धक्कादायक असून हा बॅनर जे मुलं पाहतील त्यांच्यावर काय संस्कार होतील, राज्याचा गृहमंत्रीच बंदूक घेऊन फिरतोयं, या गोष्टी मिर्झापूर वेबसिरीज, टिव्ही सिरीयलमध्ये चालतात पण हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे, देश बंदुकीने नाही तर संविधानाने चालणार, तुम्ही बंदूक दाखवा आम्ही संविधान दाखवणार असल्याचं म्हणत सुळेंनी सुनावलंय.

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर की संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न; ‘वंचित’च्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला संशय

पंतप्रधान मोदी सहाव्यांदा पुण्यातील एकाच कार्यक्रमाला :
सहाव्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मेट्रो उद्घाटन करण्याठी येत आहेत, त्याच्या ऑफिसला सांगितले नसेल की आपण एकाच मेट्रो कार्यक्रमाला जात आहेत, हे मोदी यांना माहिती नसावं. आम्ही आमच्या मतदरसंघातील लोकांसाठी आज निधी मागत आहोत. अनेक भूखंडांबाबत विषय समोर आले आहेत, कॅबिनेट ओव्हर रोल करत पुढे ढकलेले जात असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

CTRL: आयुष्याचे नियंत्रण एआयकडे आणि… अनन्या पांडेच्या ‘सीटीआरएल’चा ट्रेलर प्रदर्शित

जिल्हा नियोजन बैठकीत आम्ही जो निधी मागतो त्यावर फुल्ली मारली जाते, आम्हाला निधी दिला जात नाही, जनतेचे काम आहेत, त्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागत आहे, हे संविधान विरोधी आहेत. विरोधक असला तरी आमच्या काळात निधी दिला जात होता. विरोधक असला तरी ठीक पण निवडणुका पुरता विरोधक परत नाही, आमच्या काळात विरोधकांनाही आम्ही निधी देत होतो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube