Audio Clip: अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर जाणूनबुजून केलेला कट?, आव्हाडांच्या पोस्टने उडाली खळबळ
Jitendra Awad on Badlapur Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा नुकताच मुंब्रा परिसरात एन्काउंटर झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती असा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. (Jitendra Awad) या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केल्याने पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे.
आव्हाड यांनी आपल्या सोशल मिडियावरती एक्स (पुर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये एक कॉल रेकॉर्डिंग आहे. अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधलं जातं आहे. ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. असं लिहत ती कॉल रिकॉर्डिंग त्यांनी शेअर केली आहे. या त्यांच्या पोस्टने आता नवीनच चर्चा रंगली आहे. तसंच, या घटनेत नक्की काय घडलं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या कथित क्लिपमध्ये संवादाची लेट्सअप मराठी पुष्टी करत नाही.
काय म्हणाले होते शरद पवार ?
बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.
अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका…
निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. pic.twitter.com/tfnkQ6HmkU— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 28, 2024