UNGA: पाकिस्ताननं इतरांवर दुष्कृत्ये लादण्याचा प्रयत्न केला; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा थेट प्रहार

  • Written By: Published:
UNGA: पाकिस्ताननं इतरांवर दुष्कृत्ये लादण्याचा प्रयत्न केला; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा थेट प्रहार

Jaishankar : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठं व्यासपीठ असलेल्या (UNGA) मधून पाकिस्तानची खरडपट्टी काढली आहे. ते म्हणाले, त्यांच्या कृत्यांमुळेच त्यांच्या देशानं जागतिक व्यवस्थेत मागे राहण्याचा मार्ग निवडला आहे. अनेक देश परिस्थितीमुळे मागे राहतात, परंतु काही देश जाणूनबुजून असे निर्णय घेतात ज्यांचे गंभीर परिणाम होतात. आपला शेजारी पाकिस्तान हे याचं अत्यंत ठळक उदाहरण आहे. असंही ते म्हणआले आहेत.

निष्क्रीय राष्ट्राचा पर्दाफाश

आज आपण पाहतो की, ज्या दुष्कृत्ये पाकिस्ताननं इतरांवर लादण्याचा प्रयत्न केला, ते आज पाकिस्तानच गिळंकृत करण्यास तयार आहेत. त्या वाईट गोष्टी त्याच्याच समाजाचं नुकसान करत आहेत. तो जगाला दोष देऊ शकत नाही. हे फक्त कर्माचं फळ आहे असंही ते म्हणाले. दुर्दैवानं त्यांच्या चुकीच्या कृत्यांचा इतरांवर, विशेषत: त्यांच्या शेजारच्या भागावर परिणाम होतो. जेव्हा राजकारण आपल्या लोकांना कट्टर बनवतं, तेव्हा त्यांचा जीडीपी केवळ कट्टरतावाद आणि दहशतवादाच्या संदर्भात मोजला जाऊ शकतो. इतरांच्या जागांवर लोभ बाळगणाऱ्या निष्क्रीय राष्ट्राचा पर्दाफाश केला पाहिजे आणि त्यांचा प्रतिकारही केला पाहिजे असंही ते म्हणाले.

मोठी बातमी : इस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या ठार; इस्त्रायली सैन्यानं केलं कन्फर्म!

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी काश्मीरमधील परिस्थितीची पॅलेस्टाईनशी तुलना केल्यानंतर जयशंकर यांनी खास पाकिस्तानवर निशाणा साधला. जयशंकर आपल्या भाषणात म्हणाले की, पाकिस्तानचा सीमेपलीकडील दहशतवाद कधीही यशस्वी होणार नाही. आपल्या कृतीचे परिणाम शेजारील देशाला भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. मी भारताची भूमिका अगदी स्पष्ट करतो. सीमेपलीकडील दहशतवादाचं पाकिस्तानचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि त्याला शिक्षा न होण्याची आशा बाळगू नये. जयशंकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावलेला भारतीय भूभाग रिकामा करणं हा मुद्दा आमच्यात सोडवायचा आहे.

शरीफ काय म्हणाले होते?

आपल्या भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जम्मू आणि काश्मीरच्या परिस्थितीची पॅलेस्टाईनशी तुलना केली होती आणि पुढे बोलताना म्हणाले की, लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्य आणि आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी शतकानुशतक संघर्ष केला आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार चर्चा करण्याचे आवाहन केलं. पाकिस्तानचं म्हणणं ‘आझाद काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नियंत्रण रेषा (LOC) ओलांडण्याची धमकी देत ​​असल्याचा आरोप करत भारतानं परस्पर सामरिक संयम व्यवस्थेचा पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारल्याचा दावाही पाकिस्तानी पंतप्रधानांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube