Sudhir Mungantivar : ‘मंत्रालयात फाईलची नॉर्मल डिलिव्हरी नाहीतर सिझेरियन करावंच लागतं’

Sudhir Mungantivar : ‘मंत्रालयात फाईलची नॉर्मल डिलिव्हरी नाहीतर सिझेरियन करावंच लागतं’

Sudhir Mungantivar : मंत्रालयात फाईलची नॉर्मल डिलिव्हरी नाहीतर सिझेरियन करावंच लागतं, या शब्दांत मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी मंत्रालयाच्या कार्यपद्धतीवरुन ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, पुण्यात आज 100 वे नाट्यसंमेलन पार पडलं. या संम्मेलनाला कला क्षेत्रातील मान्यवरांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis), नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आदी उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवार बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले, मागील सरकारच्या काळात काय अनुभव होते ते मला माहित नाही पण तुमचं सरकारी व्यवस्थेबद्दल जे मत आहे ते विदुषित झालं आहे. मंत्रालयात कोणतीही फाईल वेगाने जात नाही, विधानसभेत हे मी अनेकदा मांडलं आहे. मंत्रालयात फाईलची नॉर्मल डिलिव्हरी होत नाही तर शिजेरीयन करावचं लागतं, असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच मंत्रालयातील कामाची पद्धत ज्याला समजली त्यालाच काम कसं करायचं हे लक्षात येते. तुम्ही मला एक गुण द्या की, निवडणूक न लढवता कसं निवडून येता येतं, ज्याचे 100 वे अध्यक्ष जब्बार पटेल तुम्ही झाला आहात. मंत्रालयात फाईल वेगाने कशी काढायची हा गुण मी देतो, असं जब्बार पटेल यांना उद्देशून मुनगंटीवार म्हणाले आहेत.

तुम्हीच एकमेकांना मान दिला नाही तर लोकं काय… राज ठाकरेंच्या कलाकारांना कानपिचक्या!

तसेच आत्तापर्यंत राज्यात नाट्यगृहांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारकडून भरीव निधी देण्यात आलेला आहे. राज्यात 75 नाट्यगृहे तयार होणार आहेत. त्यासाठी सरकारकडे निधीची कमतरता नाहीये, राज्यात 75 नाट्यगृहांची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आमच्यातील कोणीही पद सोडणार नसल्याचं आश्वासनच सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.

या संमेलनात मान्यवरांनी राजकीय नेते उत्तम नाटकं करीत असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आम्ही नाट्यरसिक आहोत, इथपर्यंत आम्हाला माहित होतं. पण तुम्ही आम्हीसुद्धा उत्तम नाटकं करतो असं म्हटलंय. आता हे आमचं कौतूक होतं की, विटंबना हे आम्हाला समजलं नाही. आम्ही नाटकं करतो पण तुम्ही नाटक क्षेत्रात एवढं राजकारण करतात की आम्ही मागे पडतो, हे काही लोकांनी कानात सांगितल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांना उद्देशून म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यातील नाट्यगृहांसाठी राज्य सरकारने भरीव निधी दिला आहे. राज्य सरकारकडे निधीची कमतरता नसून महाराष्ट्राकडून केंद्र सरकारला जीएसटीमार्फत 16 टक्के दिले जातात. म्हणूनच म्हणतो की, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला जातात तेव्हा कार्यकर्त्यांकडून तुम आगे बढो, असे नारे देतात, पण आज मी सांगतो, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, असं आश्वासनच मुनगंटीवारांनी नाट्यसंमेलनातील रसिकांना दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube