Jitendra Awhad : ..तर भाजपने श्रीरामालाच पक्षचिन्ह केलं असतं; आव्हाडांचा घणाघात
Jitendra Awhad : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. राज्याच्या राजकारणातही या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. या लोकांनी रामालाच आपल्या पक्षाचे चिन्ह करून टाकले असते, अशी टीका आव्हाड यांनी केली. आमदार आव्हाड यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Jitendra Awhad : ‘मग, देशातील 77 टक्के लोक शेण खातात का?’ आव्हाडांचा फडणवीसांना सवाल
ते पुढे म्हणाले, की निवडणूक आयोगाने कोणत्याही देवाचा पक्षचिन्ह म्हणून वापरण्यास बंदी घातली आहे. अन्यथा या लोकांनी कमळ काढून रामाचे छायाचित्र लावले असते. मी बोलताना इतिहासाचे दाखले देतो हीच माझी चूक आहे असे आता मला वाटायला लागले आहे. कारण लोकांना आता इतिहासच समजून घ्यायचा नाही. आपल्या डोक्यात आहे तेच खरं. बोलताना पानं दाखवा. आता रामटेकबद्दल मी जे बोललो ते खोटं आहे असे दाखवा मी लगेच पुरावे देतो. आपले विचार दुसऱ्यावर लादण्याचा जो कार्यक्रम सध्या सुरू आहे त्यावरून आपली मानसिकता एककल्ली होईल आणि शेवटी देशाची विविधता नाहिशी होईल.
मी साधा प्रश्न विचारतोय की राम क्षत्रिय होते की नाही याचं उत्तर देऊन टाका. उत्तर द्यायला मात्र कुणीच पुढे येत नाही. ज्यावेळी राम आम्ही आमचा म्हणतो तेव्हा आमचाच म्हणतो. प्रभू श्रीराम श्रद्धेय आहेत. त्यांच्याबद्दल आदरच आहे. पण आता हे लोक आम्हाला प्रभू श्रीराम शिकवणार आहेत. ठीक आहे विपरीत परिस्थितीत शांत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. विचार मांडणेच आता लोकांना आवडत नाही, अशी आता परिस्थिती आहे. त्यामुळे शांत राहिलेलेच बरं. पण, शांत राहण्याचे परिणाम देशाला भोगावे लागतील. देश आता कशावरच बोलत नाही.
जितेंद्र आव्हाड मांजरीच्या तोंडासारखा दिसतो, याचे बाप-दादा; संजय गायकवाडांचे टीकास्त्र
आम्ही पाहिजे तेव्हा अयोध्येला जाऊ
राम मंदिराचे आमंत्रण देणारे हे कोण आहेत? हे काय मंदिराचे मालक आहेत का? राम संपूर्ण देशाचा आहे. राम हा शब्द प्रत्येकाच्या मनात आहे. हे रामाचे जे मार्केटिंग करतात ना हा त्यातला प्रकार आहे. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊ. राम मंदिराचे उद्घाटन करायचे असेल तर राष्ट्रपतींच्या हस्ते करा. नवीन पार्लमेंटच्या पुजेवेळी एकाही महिलेला निमंत्रण दिले नाही. देशातून जातीवाद कधी संपणार, असा सवाल आव्हाड यांनी केला.