Ayodhya : राम मंदिराच्या उद्घाटनाने अयोध्येच्या ठाकुरांची ‘ती’ शपथ पूर्ण! 500 वर्षांनंतर घालणार पगडी
Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya ) होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांनाच आहे. मात्र अयोध्येपासून पंधरा किलोमीटर असणाऱ्या सरायरासी या गावाला मात्र या राम मंदिर निर्माणाचा आनंद जास्तच आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना या गावाचं आणि राम मंदिराचं नेमकं कनेक्शन काय? चला तर जाणून घेऊ सविस्तर…
…म्हणून पुणे विमानतळाचं उद्घाटन रखडलं; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण…
सरायरासी अयोध्या पासून पंधरा किलोमीटरवर असणार एक गाव. सध्या गावात राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा आनंद साजरा केला जात आहे. याचं कारणही तसंच आहे. राम मंदिर निर्माण झाल्याने या गावातील सूर्यवंशी ठाकूर या समुदायाची तब्बल पाचशे वर्षांपूर्वीच्या एका शपथेतून मुक्तता होणार आहे. त्यामुळे राम मंदिर निर्माण होणे. हा या सूर्यवंशी ठाकूर समुदायाचा विजयच आहे.
Aarya 3: ‘लौट आई है शेरनी…’ सुष्मिता सेनच्या ‘आर्या 3’चा दमदार टीझर प्रदर्शित
हा समुदाय स्वतःला प्रभू श्रीरामांचे वंशज मानतो. यांच्या पूर्वजांनी तब्बल 500 वर्षांपूर्वी जेव्हा मुगल सम्राट बाबरने राम मंदिराच्या जागी बाबरी मज्जिद निर्माण केली होती. त्यावेळी 1528 मध्ये बाबरचा सेनापती मीर बाकी याच्याकडून राम मंदिराच्या जागेवर निर्माण करण्यात येत असलेल्या मशिदीच्या बांधकामाला विरोध करण्यात आला होता. सूर्यवंशी ठाकूर आणि बाबर सेनापती मिर बाकी याच्या सैन्यात त्यावेळी युद्ध झालं होतं. ज्यामध्ये तब्बल 80 हजार सूर्यवंशी ठाकूरांना मारण्यात आलं. युद्धात ठाकूर पराभूत झाले.
Ravindra Dhangekar यांना लोकसभेची हसीन स्वप्न पडताय; चंद्रकांत पाटलांवरील टीकेवर भाजपचा टोला
जेव्हा ठाकूर गजराज सिंह हे युद्धावरून गावात परतले. तेव्हा काही महिलांनी त्यांना राम मंदिर वाचवू शकले नाही. त्यामुळे तुम्हाला पगडी घालण्याचा अधिकार नाही असं सुनावलं. त्यांच्यासह पूर्ण समुदायाच्या हे जिव्हारी लागलं आणि त्याचवेळी या सूर्यवंशी ठाकूरांनी शपथ घेतली की, जोपर्यंत अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण होत नाही. तोपर्यंत ठाकूर वंशाचा कोणताही व्यक्ती डोक्यावर पगडी घालणार नाही.
काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती; हायकोर्टाकडून जामीन मंजूर
आज या गोष्टीला पाचशे वर्ष होऊन गेले. तरी देखील सूर्यवंशी ठाकूर यांचा वंश पसरलेल्या तब्बल 126 गावांमध्ये आजतागायत कोणीही पगडी घातली नाही. पुरुषांबरोबर या गावांमध्ये महिला देखील डोक्यावरून पदर घेत नाहीत. या महिला देखील मानतात की, जोपर्यंत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा छत सजत नाही. तोपर्यंत त्या त्यांचं डोकं देखील झाकणार नाहीत.
पाचशे वर्षांमध्ये ठाकूर यांच्या आठ पिढ्या गेल्या सध्या नववी पिढी सुरू आहे. तेव्हापासून आतापर्यंत या गावांमध्ये मुलींच्या लग्नामध्ये मंडप टाकला जात नाही. त्याचबरोबर नवरदेवाला पगडी घातली जात नाही. त्याचबरोबर कोणीही चामड्याचे बूट चालत नाहीत. तसेच धुमधडाक्यात कोणतेही कार्यक्रम साजरे केले जात नाहीत.
बाबरचा सेनापती मिर बाकी आणि सूर्यवंशी ठाकूरांमध्ये झालेल्या या लढाईचा पुरावा ब्रिटीश अधिकारी कनिंघम यांनी देखील दिला होता. आयोध्येतील राम मंदिरापासून 14 कोसांवर पसरलेल्या वेगवेगळ्या गावांमध्ये सर्वात जास्त संख्या सूर्यवंशी ठाकूर या समुदायाची आहे. त्याचबरोबर त्यामध्ये सगळ्यात मोठं गाव आहे ते म्हणजे सरायरासी. त्यामुळे आता पाचशे वर्षांनंतर प्रभू श्रीराम मंदिर निर्माण होणं, येत्या 22 तारखेला या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणं या सूर्यवंशी ठाकूर समाजाला डोक्यावर पगडी न घालण्याच्या शपथेतून आठ पिढ्या नंतर मुक्तता देणारं ठरणार आहे. तर मंडळी तुम्हाला या ठाकूरांच्या शपथेबद्दल काय वाटत? कमेंट करून…