मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, विधानसभा अध्यक्षांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, विधानसभा अध्यक्षांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Rahul Narvekar On Uddhav Thackeray : विधानसभा अध्यक्ष न्यायाधिशांच्या भूमिकेत आहेत तर मुख्यमंत्र्यांना भेटलेच कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यावर राहूल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार म्हणून माझ्या विधानसभा क्षेत्रातील प्रश्न सोडवणं हे माझं कर्तव्य आहे. विधीमंडळ आणि राज्यातील इतर प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासठी मला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटलं आहे.

राहूल नार्वेकर म्हणाले की अशी प्रकारचे आरोप निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी हेतूपूर्वक केले जात आहेत. हे मी पूर्वी सांगितले आहे आणि आता देखील सांगतो. मुख्यमंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष कोणत्या कामांसाठी भेटतात हे माजी मुख्यमंत्र्यांना माहिती असायला हवं. तरीही ते असा आरोप करत असतील तर त्यांचा हेतू काय आहे. हे स्पष्ट होतं.

Disqualification MLA : लवाद अन् आरोपींची दोनवेळा भेट; उद्धव ठाकरेंनी भेटीचा पुरावाच दाखवला

ते पुढं म्हणाले की विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिका निकाली काढत असतात त्यावेळेला इतर कामे करु नये असा कुठंही आदेश नाही. विधानसभा अध्यक्ष म्हणून विधीमंडळ बोर्डाची काम असतात, त्यात मुख्यमंत्री देखील सदस्य असतात. आमदार म्हणून माझ्या विधानसभा क्षेत्रातील प्रश्न सोडवणं हे माझं कर्तव्य आहे. राज्यातील इतर प्रश्नासंदर्भात राज्याच्या कार्यकारी मंडळाच्या मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर प्रश्न मार्गी लागत असतील तर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासठी मला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही, असे राहूल नार्वेकर यांनी म्हटले.

कृष्णा-गोदावरी खोऱ्यात पहिल्यांदाच मिळालं इंधन तेल, भारत सरकारला मोठं यश

3 जानेवारीला मुख्यमंत्र्यासोबत नियोजित बैठक होती पण मी आजारी असल्याने ती होऊ शकली नाही. तब्बेत बरी झाल्यानंतर मतदारसंघातील काही महत्त्वाच्या प्रश्नांसाठी रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विधीमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात ही भेट होती. परंतु जी लोक स्वत: माजी मुख्यमंत्री झाले आहेत, ज्यांना विधानसभा अध्यक्षाच्या कार्याची माहिती असावी. त्यांनीचं बिनबुडाचे आरोप केले तर त्यांचा हेतू काय आहे हे सर्वांना स्पष्ट समजते, असे राहूल नार्वेकर यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube