Devendra Fadnavis : ‘सरकार कालही स्थिर होते, उद्याही राहिल’; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Devendra Fadnavis : ‘सरकार कालही स्थिर होते, उद्याही राहिल’; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Devendra Fadnavis on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे (Rahul Narvekar) सुरू आहे. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या कोणत्याही परिस्थितीत नार्वेकर यांना निर्णय द्यावा लागणार आहेत. मात्र निकाल येण्याआधीच राजकीय नेते आणि मंत्र्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रकरणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीप्रकरणी भाष्य केले.

मला इतकीच अपेक्षा आहे की योग्य आणि कायदेशीर निर्णय विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष देतील. आमच्या शिवसेनेची बाजू अतिशय भक्कम आहे. अतिशय कायदेशीर पद्धतीने आम्ही सरकार तयार केले आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की विधानसभा अध्यक्षांच्या निकालातून आम्हाला न्याय मिळेल. सरकार कालही स्थिर होते आणि उद्याही स्थिरच राहिल.

Devendra Fadnavis : काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

आमदार अपात्र झाले तरी फरक नाही – गिरीश महाजन 

विधानसभा अध्यक्ष निकाल देतील. जो निर्णय असेल तो देतील तो सगळ्यांना मान्य असेल. संपूर्ण देशासाठी हा दिशादर्शक असा निकाल असेल. सगळाच पक्ष एका बाजूला आहे. दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार बाहेर पडले म्हणून कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. पण यांच्यात भाजपाचा काहीच संबंध नाही. राष्ट्रवादीतही तसेच झाले आहे. राजकीय पक्षांसाठी हा निर्णय परिणाम करणारा ठरणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काहीच फरक नाही कारण दोन्ही ठिकाणी परिस्थिती सारखीच आहे. अध्यक्षांनी ऐकून घेतले आहे, वकिलांनी म्हणणे मांडले आहे. जर तर असे काही नाही सरकार स्थिर राहील 200 च्या वर आमच्याकडे संख्याबळ आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला फरक पडणार नाही. अजित पवार यांच्याकडे आमदार आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेला काही होणार नाही असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube